Pune Rain : पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी

Rain Update : पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत ठरणार आहे.
Weather
Weather Agrowon
Published on
Updated on

Pune News : परतीच्या पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी रविवारी (ता. २२) रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. सोमवारी (ता. २३) सकाळी आठपर्यंत भोरमधील वेळू येथे ४४ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली. पावसामुळे हवेत काहीसा गारवा तयार झाला असला तरी अनेक ठिकाणी काढणी केलेल्या बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद अशा पिकांच्या नुकसानीस हा पाऊस कारणीभूत ठरणार आहे.

मागील काही दिवस ऊन पडत असल्याने शेतीकामांनी चांगलाच वेग घेतला होता. त्यानंतर मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होत आहे. रविवारी सकाळपासून वातावरणात बदल होत होता. सायंकाळी ढग दाटून आले आणि रात्री अनेक ठिकाणी जोरदार व हलका पाऊस पडला.

Weather
Rain Update: उद्या राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

हवेलीतील उरूळी कांचन येथे ३५ मिमी पाऊस झाला. तर हडपसर येथे ३० मिमी, तर खेड शिवापूर येथे २९ मिमी, पुणे वेधशाळा, केशवनगर येथे १४ मिमी पाऊस पडला. तर खडकवासला, थेऊर, उरुळीकांचन, खेड, भोसरी, कळस, हडपसर, वाघोली येथे हलका पाऊस झाला. मुळशीतील थेरगाव, माले, मुठे येथे शिडकावा झाला.

Weather
Monsoon Retreat : माॅन्सून निघाला परतीच्या प्रवासाला; पश्चिम राजस्थान, कच्छच्या काही भागातून माघार

भोरमधील भोलावडे, नसरापूर, किकवी, वेळू, आंबवडे, संगमनेर, निगुडघर येथे हलका, वेल्ह्यातील पानशेत, विंझर, आंबवणे येथे तुरळक सरी पडल्या.जुन्नरमधील नारायणगाव, निमगाव सावा, आपटाळे, ओतूर, खेडमधील राजगुरुनगर, आळंदी, पिंपळगाव, कन्हेरसर, कडुस, आंबेगावमधील आंबेगाव, पारगाव, शिरूरमधील टाकळी, वडगाव, न्हावरा, मलठण, तळेगाव, रांजणगाव, कोरेगाव, पाबळ येथे हलका पाऊस झाला.

बारामतीतील सुपा येथे ३१ मिमी पाऊस झाला असून माळेगाव, पणदरे, वडगाव, लोणी, सुपा, मोरगाव, उंडवडी, इंदापुरातील भिगवण, इंदापूर, लोणी, बावडा, काटी, निमगाव, अंथुर्णी, सणसर, दौंडमधील देऊळगाव, पाटस, यवत, कडेगाव, राहू, वरवंड, रावणगाव, दौंड, पुरंदरमधील सासवड, भिवंडी, कुंभारवळण, जेजुरी, परिंचे, राजेवाडी, वाल्हा येथे हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे शेतकऱ्यांची धावपळ झाली. काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com