Unseasonal Rain : अवकाळी पावसाने भंगले सोनेरी स्वप्न

Rain Update : विजेच्या कडकडाटासह आलेल्या परतीच्या पावसाने या स्वप्नाची राख रांगोळी झाली. जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील बजरंग खामकर हे शेतकरी खरिपातील वास्तव सांगत होते.
Rain Alert
Rain AlertAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : पुराच्या संकटानंतर काहीसा दिलासा मिळाला. गेल्या पंधरा दिवसांमध्ये पडलेले कडक ऊन यंदाच्या खरिपामध्ये चांगले उत्पन्न मिळवण्याचे स्वप्न दाखवत होते. दोनच दिवसांमध्ये पिकाची काढणी करायची आणि भुईमुगाची शेंगा भरलेली पोती घरात आणून ठेवायची, असे नियोजन सुरू झाले. सध्या मजुराची मोठी टंचाईही असल्याने मजुरांची जुळवा जुळव सुरू झाली. संध्याकाळीच विजेच्या कडकडाटासह आलेल्या परतीच्या पावसाने या स्वप्नाची राख रांगोळी झाली. जयसिंगपूर (ता. शिरोळ) येथील बजरंग खामकर हे शेतकरी खरिपातील वास्तव सांगत होते.

अर्ध्या एकरात दहा ते पंधरा पोती शेंग झाली असती आता एक पोते ही होण्याची शक्यता नाही हे सांगताना त्यांची अस्वस्थता लपत नव्हती. यंदा शिरोळ तालुक्याला ही पुराचा मोठा फटका बसला. जी पिके पुराच्या पाण्यात बुडाली नाहीत त्या पिकांची पावसामुळे चांगली वाढ झाली. वाढीच्या काळात ही दहा-बारा दिवसांच्या फरकाने चांगला पाऊस झाल्याने यंदा खरिपाचे उत्पन्न चांगलं येणार हे खुणावू लागले होते.

Rain Alert
Rain Update: उद्या राज्यातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाचा इशारा

गेल्या आठ दिवसांपासून सोयाबीन भुईमुगाची काढणी व मळणी सुरू झाली. मात्र पावसाने शेतकऱ्यांच्या खरीप पिकाचे नियोजन पूर्णपणे बिघडवून टाकले. उत्पादन खर्च निघणे ही मुश्कील बनले आहे. दुपारी चारनंतर रात्री उशिरापर्यंत कधीही जोरदार पावसाचा दणका शिवाराला बसत असल्याने शेतकरी पुरता हतबल झाल्याचे चित्र शिवारातून फिरताना जाणवते.

Rain Alert
Retreating Monsoon : परतीचा पाऊस धुमाकूळ घालण्याची शक्यता

गेल्या आठ-दहा दिवसांपासून प्रत्येक शिवारामध्ये सुरू असणारे ट्रॅक्टर्स आणि शेतीकामाची लगबग दोन दिवसांत एकदम थांबली. वाहत येणाऱ्या पाण्याबरोबर जणू निराशाच शिवारामध्ये आली. चांगल्या वाफशामुळे काढण्यासाठी आलेली पिके पाण्यामध्ये तरंगू लागली. ज्या शेतकऱ्यांनी पुढील एक दोन दिवसांमध्ये भुईमुगासारखी पिके काढण्याची नियोजन केले होते त्याची काढणी आता शक्य होणार नाही.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत पाऊस सुरू झाला आहे. पाणी साचून किती नुकसान झाले आहे या बाबतची आकडेवारी संकलित करण्यात येत आहे. पावसामुळे खरिपाची काढणी लांबणीवर जाणार आहे.
जालिंदर पांगरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com