मोनाली जोशी, डॉ. विजया पवार
Amla Farming : गंभीर आजारांविरोधात लढण्यासाठी शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायामासह आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश असावा. शरीरास पोषक असणाऱ्या तसेच हंगामाप्रमाणे उपलब्ध असणाऱ्या फळ-भाज्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. यापैकीच एक आरोग्यवर्धक फळ म्हणजे आवळा. या फळामुळे शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास मदत होते.
आवळा हे फळ आरोग्यवर्धक फळ म्हणून ही ओळखले जाते. आवळ्यात क जीवनसत्त्व भरपूर असून, इतर फळांत न मिळणारा तुरट रस भरपूर असतो. आयुर्वेदामध्ये आवळ्याचे आरोग्यदायी महत्त्व सांगण्यात आले आहे, आवळा हे फळ हिवाळ्यात येणारे फळ असून, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून ते आपल्याला वर्षभर वापरता येऊ शकते.
लोणचे, मुरंबा, ज्यूस, सुपारी, चूर्ण आदी तयार करून आपण त्याचा विविध प्रकारच्या आजारांवर औषध म्हणून वापर करू शकतो. आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅण्डी, आवळा लोणचे, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात.
आवळा तुरट-आंबट असल्याने पित्त, कफ व जुलाब यावर गुणकारी ठरतो.
फळात जीवनसत्त्व ‘क’चे प्रमाण अधिक असल्यामुळे आवळा मानवी शरीरास लाभदायक ठरतो.
सर्दी, पडसे, खोकला या आजारांवर गुणकारी.
रस स्मरणशक्ती वाढण्यास गुणकारी ठरतो.
स्त्रियांच्या मासिक पाळीच्या विकारात आवळ्याच्या रसाचा उपयोग केला जातो. महिलांना मासिक पाळीच्या काळात आवळ्याचे सेवन केल्याने पोटदुखी, कंबरदुखी, अनियमितता, रक्ताच्या समस्या या सर्व त्रासांवर आवळा गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, यामुळे फायदा होतो.
पोटामधील आजारावर आवळ्याचा रस घेतल्यास फायदेशीर ठरतो.
उन्हामुळे डोळ्यांची आग होते किंवा डोळे थकतात अशा वेळी आवळ्याच्या बियांच्या काढ्याने डोळे धुतल्यास हा त्रास कमी होतो. डोळ्यांचे स्नायू बळकट होऊन दृष्टी सुधारते.
जीवनसत्त्व ‘क’ची शरीरातील कमतरता पूर्ण करून अनेक आजारांपासून मानवी शरीराचे संरक्षण होते.
मधुमेहाच्या आजारावर फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये क्रोमियम तत्त्व मोठ्या प्रमाणावर असते. यामुळे तुमच्या शरीरातील इन्शुलिन पेशी मजबूत होऊन शरीरातील साखरेचे प्रमाणावर नियंत्रण ठेवता येते.
आवळा हृदयविकारावर गुणकारी ठरतो. आवळ्यामध्ये असणारी औषधी गुणधर्म बीटा ब्लॉकरच्या प्रभावाला कमी करतात. यामुळे तुमचे हृदय तंदुरुस्त राहते. तुमच्या शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्याचे कामही आवळा करतो.
पचनक्रिया सुधारण्यास आवळ्याचा उपयोग होतो. अन्न पचविण्यासाठी आवळा फायद्याचा ठरतो. गॅस, ॲसिडिटी, आंबट ढेकर यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी आवळा लाभदायी ठरतो.
शरीरातील पचनक्रिया मजबूत करतो. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत मिळते.
मोठ्या प्रमाणावर कॅल्शिअम असते. यामुळे ऑस्ट्रोपोरोसिस, अर्थराईटिस आणि हाडांचे विकार यावर आवळा हा गुणकारी ठरतो व तसेच हाडे मजबूत होण्यास मदत होते.
मोतीबिंदू, दृष्टी कमी होणे, ब्लाइंडनेस यांसारख्या आजारांवर आवळ्याचा रस गुणकारी ठरतो.
आवळ्यामध्ये जिवाणू आणि बुरशीचा प्रादुर्भाव रोखण्याची ताकद असते. आवळ्याचे नियमित सेवन केल्याने कोणताही प्रादुर्भाव होत नाही.
मोनाली जोशी, ७२१९८५७४६०
(अन्न प्रक्रिया तंत्रज्ञान विभाग, अन्नतंत्रज्ञान महाविद्यालय, परभणी)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.