Aslam Abdul Shanedivan
आपल्याकडे आवळा फळास अन्यन साधारण महत्व आहे. त्याचे महत्व आयुर्वेदात देखील सांगण्यात आले आहेत. त्यामुळे यावर प्रक्रिया करून नव्या उद्योगाला सुरूवात करता येईल.
आवळ्यापासून पंचारिष्ठ, च्यवनप्राश, चूर्ण, चहा पावडर, दंतमंजन, केसतेल यांसारखी विविध उत्पादने तयार होतात. आवळा फळावर प्रक्रिया करून त्यापासून रस, सरबत, स्क्वॅश, सिरप, कॅण्डी, सुपारी, पावडर, लोणची असे अनेक अन्नपदार्थ तयार करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.
बनारसी जातीची फळे मोरावळा आणि रस करण्यासाठी वापरता येतो. साधारणपणे १ किलो तुकडयांपासून किंवा किसापासून ६५० मिलि रस मिळतो. अशा प्रकारे तयार केलेल्या रसाचा ब्रिक्स ८ ते ९ एवढा असतो आणि आम्लता २ टक्के असते.
लोणचे तयार करण्यासाठी लहान आकाराची देशी जातीची फळे वापरावीत. १ किलो आवळा तुकड्यांसाठी १५० ग्रॅम मीठ, १० ग्रॅम हळद, १० ग्रॅम लाल मिरची पावडर, ३० ग्रॅम मेथी आणि ३०० मिलि गोडेतेल यांचा वापर करावा.
पूर्ण पिकलेल्या आवळा फळांमध्ये सर्वसाधारणपणे ‘क’ जीवनसत्त्व, आम्लता, साखर, टॅनिन सारखे तुरट रासायनिक घटक असतात.
औषधी गुणधर्म हा प्रामुख्याने त्यामध्ये असणारे क जीवनसत्त्व आणि फिनॉलिक घटकाचे भरपूर प्रमाण आवळ्यात आहे.
रक्तशुद्धी, आम्लता कमी होणे, पचनशक्तीत वाढ, रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करणे, रोग प्रतिकारक शक्तीत वाढ, श्वसन तसेच दमा, सांधेदुखी इत्यादी अनेक जटील समस्यांवर आवळा उपयोगी.