Amla Organic Farming : आवळ्याच्या सेंद्रिय शेतीतून कुटुंबाने केली यशस्वी वाटचाल

sandeep Shirguppe

आवळ्याची सेंद्रिय शेती

धुळ्यातील पूनमचंद जयराम पाटील या शेतकऱ्याने आधुनिकतेची कास धरत साडे चार एकरवर सेंद्रिय आवळ्याची शेती करत नवा पर्याय उभा केला आहे.

Amla Organic Farming | agrowon

यशस्वी प्रयोग

कुटुंबाला सोबत घेत तब्बल साडेचार एकरवर सेंद्रिय आवळ्याचे उत्पादन घेत यशस्वी सेंद्रिय शेतीचा प्रयोग करून दाखवला आहे.

Amla Organic Farming | agrowon

४०० आवळ्यांची झाडे

मुंबई-आग्रा महामार्गावरील देवभाने गावाजवळ त्यांची शेती आहे. वडील आणि मुलाने ४०० च्या पुढे आवळ्याच्या झाडांची लागवड केली.

Amla Organic Farming | agrowon

एका झाडापासून १०० किलो उत्पादन

झाडांच्या वाढीचा कालावधी झाल्यानंतर आवळ्याचे उत्पादन मिळू लागले आहे. एका झाडापासून सरासरी ९० ते १०० किलो उत्पादन मिळत आहे.

Amla Organic Farming | agrowon

१७ लाखांचे उत्पन्न

तर या सेंद्रिय आवळ्यापासून त्यांना पुढील चार महिन्यांत तब्बल १७ लाखांचे उत्पन्न दृष्टीपथात आहे.

Amla Organic Farming | agrowon

४० ते ५० रुपये किलो दर

शेताच्या बांधावर ५० रुपये प्रतिकिलो, तर होलसेल व्यापारी ३५ ते ४० रुपये किलो दराने आवळ्याची खरेदी करतात.

Amla Organic Farming | agrowon

केमिकलयुक्त घटक

पाटील हे थेट आवळ्याच्या झाडांना गाई बांधतात यामुळे गायीचे मलमूत्र व शेणखत दररोज पडत असल्याने रासायनिक खत व केमिकलयुक्त द्रव पदार्थ दिले जात नाही.

Amla Organic Farming | agrowon

आवळा जास्त काळ टिकतो

सेंद्रिय पद्धतीने आवळ्याचे उत्पादन घेतले जात असल्यामुळेच आवळा झाडावर जास्त दिवस टिकून राहतो.

Amla Organic Farming | agrowon

लाखो रुपयांचा नफा

पाटील यांना सगळा खर्च जावून १२ लाख २५ हजार निव्वळ आवळा पिकापासून नफा अपेक्षित मिळण्याची आहे.

Amla Organic Farming | agrowon

दुधाचा धंदाही तेजीत

शेतातच गायी असून, दूध उत्पादनही घेतले जाते. त्यामुळे दुहेरी फायदा असल्याचे शेतकरी पूनमचंद पाटील यांनी सांगितले.

Amla Organic Farming | agrowon
wheat irrigation | agrowon
आणखी पाहा...