Moong Production : मुगाची अवघी २६ किलो प्रति हेक्‍टरी उत्पादकता ; सातत्याने उत्पादकतेत घट

Green Gram production : वातावरणातील बदलाच्या परिणामी नगदी आणि हमखास उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेल्या मूग, उडीद पिकांची उत्पादकता प्रभावित होत असल्याचे चित्र आहे.
Moong Production
Moong Production Agrowon
Published on
Updated on

Amravati News : वातावरणातील बदलाच्या परिणामी नगदी आणि हमखास उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेल्या मूग, उडीद पिकांची उत्पादकता प्रभावित होत असल्याचे चित्र आहे. गेल्या हंगामात अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांपैकी सर्वाधिक कमी उत्पादकता अमरावती जिल्ह्यात झाली होती. सातत्याने उत्पादकता कमी होत असल्याने मूग, उडीद उत्पादकांची चिंताही वाढीस लागली आहे.

Moong Production
Moong Production : यंदा मुगाचे एकरी उत्पादन १० पासून ५० किलोपर्यंत

गेल्या हंगामातील ७७५५ रुपयांवरून यंदा ८५५८ रुपयांचा हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. जून महिन्यातच याच्या लागवडीची शिफारस आहे. परंतु गेल्या काही वर्षांपासून वातावरणातील बदलाचा फटका या पिकाला बसत असल्याचे चित्र आहे. जून महिन्यात पावसाचा हमखास खंड राहतो. त्यानंतर धो-धो पाऊस बरसत असल्याने पीक काढणीला अडचणी येतात, असाच अनुभव शेतकऱ्यांचा आहे. असमान पाऊसमानाच्या परिणामी उत्पादकता सातत्याने कमी होत असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

Moong Production
Moong Urad Sowing : अनिश्‍चित पाऊसमानामुळे मूग-उडदाचे क्षेत्र घटले

अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांचा विचार करता २०२२-२३ या वर्षात बुलडाणा जिल्ह्यात मुगाचे प्रति हेक्‍टरी ६३९, अकोला २७०, वाशीम ४६४, यवतमाळ २८४ किलो याप्रमाणे उत्पादकता नोंदविण्यात आली. यामध्ये सर्वांत कमी २६ किलो प्रति हेक्‍टर उत्पादकता अमरावती जिल्ह्यात नोंदविली गेली. या पाच जिल्ह्यांत उडदाच्या उत्पादकतेवरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे. प्रति हेक्‍टर, किलोग्रॅम उत्पादकतेचा विचार करता बुलडाणा ६३२, अकोला ३४०, वाशीम ५६३ तर यवतमाळ २९७ होती. उडदाच्या उत्पादकतेतही अमरावती जिल्हा पिछाडीवर राहिला. या जिल्ह्यात अवघी २९ किलो प्रति हेक्‍टर अशी उत्पादकता नोंदविण्यात आली.

दर तेजीत...

अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर तालुक्‍यात मुगाखालील क्षेत्र आहे. परंतु अनिश्‍चित पाऊसमानाचा परिणाम उत्पादकतेवर होत असल्याने यंदा मूग, उडदाची केवळ १५०० हेक्‍टरवरच लागवड आहे. या वेळीदेखील पिकाला पावसाचा फटका बसला. परिणामी, बाजारात आवक कमी असल्याने दर १३५०० रुपयांवर पोहोचले असून, ते हमीभावापेक्षा अधिक आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com