Water Scarcity : नगर जिल्ह्यात वाढल्या पाणीटंचाईच्या झळा

Water Issue : नगर जिल्ह्यात आता गावे, वाड्या, वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आतापर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २३७ वर पोहोचली आहे.
Water Scarcity
Water ScarcityAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात जसे ऊन वाढतेय तशा टंचाईच्या झळाही वाढू लागल्या आहे. कधीकाळी टॅंकरमुक्तीचा नारा देणाऱ्या नगर जिल्ह्यात आता गावे, वाड्या, वस्त्यांना टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत असून आतापर्यंत टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्या २३७ वर पोहोचली आहे.

नगर जिल्ह्यात एप्रिलच्या पहिल्याच आठवड्यात टंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. परिणामी जिल्ह्यातील गावोगावी पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यातील टॅंकरची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सध्या सुमारे २३७ टॅंकरने जिल्ह्यातील २२७ गावे व १२५२ वाडी, वस्तीवर पाणीपुरवठा केला जात आहे.

Water Scarcity
Water Scarcity : ‘जनाई उपसा’तून पाणी जिरेगाव तलावात सोडा

याशिवाय पाणी असलेल्या ९३ विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने निविदा काढून वर्षभरासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. मार्चच्या पहिल्या आठवड्यात टॅंकरची संख्या अवघी २४ होती. मात्र जशा उन्हाच्या झळा वाढू लागल्या तशी पाणी टंचाईही वाढत आहे.

यंदा पावसाने ताण दिल्याने जिल्ह्यात उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईची स्थिती आहे. जिल्‍ह्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आढावा बैठका झाल्या आहेत. त्यात संभाव्य टंचाईचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्यानुसार मागेल त्या गावात आता टॅंकरचे नियोजन केले आहे. मात्र अद्याप तालुक्यासह जिल्हास्तरावर टॅंकरचे प्रस्ताव पडून आहेत. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. पाणीटंचाईमुळे नेत्यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने मंजूर केल्याप्रमाणे खेपा होत नाहीत. दररोज ५८६ मंजूर खेपांपैकी ४५८ खेपा होत आहेत.

Water Scarcity
Water Scarcity : पाण्यासाठी महिलांची एक किमी पायपीट

जीपीएसद्वारे वॉच

ग्रामीण भागात टॅंकरने पाणीपुरवठा करताना ठरलेल्या मार्गावरून टॅंकर जातो का? यासाठी टॅंकरमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यानुसार सर्वच टॅंकरमध्ये जीपीएस प्रणाली बसविण्यात आली आहे. त्या माध्यमातून टॅंकरवर वॉच ठेवण्यात येत आहे.

तालुकानिहाय टॅंकरची संख्या

संगमनेर : २१, अकोले : ४, कोपरगाव : ०, श्रीरामपूर : ०, राहुरी : ०, नेवासा : २, राहाता : ०, नगर : १५, पारनेर : २२, पाथर्डी : ८७, शेवगाव : ८, कर्जत : ३१, जामखेड :१८, श्रीगोंदा : ९, नगरपालिका पाथर्डी : १, नगरपालिका कर्जत : १२, नगरपालिका पारनेर : २, नगरपालिका श्रीगोंदा : ४, नगगरपालिका शेवगाव : १.

जनावरांच्या पाण्याचे काय

नगर जिल्ह्यात सध्या प्रामुख्याने पाथर्डी, पारनेर, कर्जत, संगमनेर तालुक्यांत पिण्याच्या पाण्याचा टॅंकरने पुरवठा केला जात आहे. या तालुक्यासह जो भाग सातत्याने दुष्काळी असतो. या भागात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही बऱ्यापैकी आहे. लोकांना टॅंकरने पाणीपुरवठा केला जातोय, मात्र जनावरांचे काय?

कारण लोकांना पाणीटंचाई आहे तर जनावरांनाही टंचाईशी सामना करावा लागत असणार, प्रशासनाकडे त्याबाबत मात्र कोणत्याही उपाययोजना नाहीत. जनावरांना चाऱ्याचाही प्रश्न जाणवत आहे. पाणी आणि चारा टंचाईने पशुपालक जेरीस आलेले आहेत. राजकीय नेते मात्र या बाबीकडे दुर्लक्ष करत मते मिळवण्यात गुंग झाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com