Guava Crop Advisory : पेरु पीक सल्ला

Guava Orchard Management : सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटा आहेत. तीव्र सूर्यप्रकाश व वाढलेल्या तापमानामुळे आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढलेले तापमान, पाणी कमतरतेमुळे फूलगळ, फळगळ दिसून येते.
Guava Orchard
Guava OrchardAgrowon

सतीश जाधव

सध्या तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उष्णतेच्या लाटा आहेत. तीव्र सूर्यप्रकाश व वाढलेल्या तापमानामुळे आंबे बहरातील फळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. वाढलेले तापमान, पाणी कमतरतेमुळे फूलगळ, फळगळ दिसून येते.

Guava Orchard
Guava Processing : आरोग्यदायी पेरूचे मूल्यवर्धन...

लहान फळे पिवळी पडून गळतात.

झाडाची पाने सुकतात, करपतात.

बागेतील उघडी पडलेली फळे

तीव्र सूर्यप्रकाशामुळे अकाली पिवळी पडतात.

पक्व फळांवर वाढलेल्या तापमानामुळे फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.

तापमान वाढीमुळे फळांची गुणवत्ता खालावते.

Guava Orchard
Guava Farming : जत तालुक्यात पेरूचे ‘कल्चर’

उपाययोजना

झाडावरील काळी पडलेली, वाळलेली फळे काढून तसेच झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.

जमिनीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी करण्यासाठी आच्छादनाचा वापर करावा.

बाष्पीभवनाचा वेग कमी करण्यासाठी केओलिन ८ टक्के द्रावणाची फवारणी करावी.

दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी १ टक्के पोटॅशिअमची फवारणी करावी. तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा.

सिंचनासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब करावा. शक्यतो सकाळी पाणी द्यावे.

फळमाशीच्या नियंत्रणासाठी प्रति हेक्टरी १० कामगंध सापळे लावावेत.

सतीश जाधव, ९४०४६८३७०९

(अखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com