Agricultural Expo 2025 : छत्रपती संभाजीनगरात आजपासून कृषी ज्ञान आणि तंत्रज्ञानाचा भव्य जागर!

Agriculture Technology : देशातील व राज्यातील नामांकित कंपन्या, संशोधन संस्था, प्रयोगशील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग असलेले आणि कृषीसह संलग्न क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची भरगच्च शिदोरी घेऊन येणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. १०) छत्रपती संभाजीनगरात सुरू होत आहे.
Agricultural Expo
Agricultural ExpoAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News : देशातील व राज्यातील नामांकित कंपन्या, संशोधन संस्था, प्रयोगशील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक कंपन्यांचा सहभाग असलेले आणि कृषीसह संलग्न क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञानाची भरगच्च शिदोरी घेऊन येणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शन शुक्रवारपासून (ता. १०) छत्रपती संभाजीनगरात सुरू होत आहे. यानिमित्ताने सोमवारपर्यंत सलग चार दिवस ज्ञान, तंत्रज्ञानाचा जागर होणार असून एक लाखाहून अधिक शेतकरी या प्रदर्शनाला भेट देण्याचा अंदाज आहे.

या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक अॅग्रिकोन न्यूट्रिटेक हे आहेत. तसेच, एन्झोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज, पवन अॅग्रो, पितांबरी अॅग्रो केअर डिव्हिजन, बी. जी. चितळे डेअरी, आत्मा (अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी), मेडा (महाऊर्जा), एमएआयडीसी या प्रदर्शनाचे सहप्रायोजक आहेत.

Agricultural Expo
Agri Expo 2025 : छत्रपती संभाजीनगरला शुक्रवारपासून ‘अॅग्री एक्स्पो-२५’

याशिवाय, रोहित कृषी इंडस्ट्रीज, इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) हे यंदाच्या प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स आहेत. या प्रदर्शनात कोरडवाहू व बागायती शेतीमधील नवतंत्रज्ञान, यंत्रे-अवजारे बघण्यास मिळणार आहेत. मराठवाडा, विदर्भ, खानदेशासह राज्याच्या विविध भागातील शेतकऱ्यांसाठी ‘अॅग्री एक्स्पो २५’ दिशादायक ठरणार आहे. नामांकित कंपन्या, उद्योग समूहांसह विविध बॅंका तसेच खते, कीटकनाशके, बियाणे अशा निविष्ठा उद्योगांकडून २०० हून अधिक भरगच्च स्टॉल्स या प्रदर्शनात सादर केले जाणार आहेत.

Agricultural Expo
Agri Expo 2025 : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

प्रगतिशील शेतकऱ्यांसाठी दर्जेदार कृषी प्रदर्शन अकरा वर्षांपासून ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून आयोजित केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर कृषी प्रदर्शनाला सुरुवात होईल. बळीराजासाठी होणारा हा अनोखा माहिती ज्ञान-तंत्रज्ञान मेळा सलग चार दिवस म्हणजे सोमवारी (ता.१३) सायंकाळपर्यंत चालू राहणार आहे. प्रदर्शनात प्रवेश सर्वांसाठी विनामूल्य आहे.

प्रदर्शनात दररोज बक्षिसाची सोडत

‘अॅग्री एक्स्पो २५’ या कृषी प्रदर्शनात येणाऱ्या शेतकऱ्यांना दररोज ट्रॅक्टरचलित पेरणी यंत्राचे बक्षीस जिंकण्याची संधीदेखील मिळणार आहे. त्यासाठी दररोज एका भाग्यवान शेतकऱ्याला सोडत काढून पेरणी यंत्र भेट दिले जाणार आहे.

- प्रदर्शनाचे स्थळ ः जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टचे मैदान.

- वेळ ः सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत

- कालावधी ः शुक्रवार ता. १० ते सोमवार ता. १३ पर्यंत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com