Agri Expo 2025 : छत्रपती संभाजीनगरला शुक्रवारपासून ‘अॅग्री एक्स्पो-२५’

Agriculture Expo : छत्रपती संभाजीनगर येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व माहितीचा खजिना सादर करणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ हे कृषी प्रदर्शन यंदा १० ते १३ जानेवारी दरम्यान दिमाखात होत आहे.
Agri Expo 2025
Agri Expo 2025Agrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगर येथे शेतीमधील नवे तंत्रज्ञान व माहितीचा खजिना सादर करणारे ‘सकाळ-अॅग्रोवन’चे भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ हे कृषी प्रदर्शन यंदा १० ते १३ जानेवारी दरम्यान दिमाखात होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

छत्रपती संभाजीनगर येथील जालना रोडवरील केंब्रिज स्कूल जवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरणार आहे. प्रदर्शनाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत असून प्रवेश विनामूल्य आहे. अॅग्रिकोन न्यूट्रिटेक हे या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असून एन्झोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज, पवन अॅग्रो, पितांबरी अॅग्रो केअर डिव्हिजन, बी. जी. चितळे डेअरी, आत्मा (अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी), मेडा (महाऊर्जा), एमएआयडीसी हे सहप्रायोजक आहेत. तसेच रोहित कृषी इंडस्ट्रीज, इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) हे गिफ्ट स्पॉन्सरर्स आहेत.

शेतकऱ्यांचे लक्ष लागून

गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट आयोजनात आघाडी घेणारे ‘अॅग्रोवन’चे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी कृषिविषयक ज्ञान, तंत्रज्ञानाची पर्वणी समजली जाते. देशविदेशांतील नामवंत अॅग्रो ब्रॅण्ड्‍स एकाच छताखाली येथे बघण्यास मिळतात. ‘समृद्ध महाराष्ट्र म्हणजेच समृद्ध शेती’ व्यवस्था असा संदेश देत आधुनिक शेतीचे धडे देणाऱ्या अॅग्रोवनच्या प्रदर्शनाकडून मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भासह राज्याच्या कानाकोपऱ्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असते.

Agri Expo 2025
Siddheshwar Agricultural Exhibition : सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन

अनेक ब्रॅण्ड्‍सचे लाँचिंग

राज्यातील कोरडवाहू व बागायती शेतकऱ्याला नवे प्रयोग करण्यास प्रेरणा देण्याचे या प्रदर्शनाच्या निमित्ताने होते आहे. ‘अॅग्री एक्स्पो २५’ला यंदा एक लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकरी भेट देण्याचा अंदाज आहे. या प्रदर्शनातील २०० वर स्टॉल्सपैकी १०० पेक्षा अधिक कृषी कंपन्यांचे स्टॉल्स आहेत.

कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित असलेल्या या प्रदर्शनात काही कंपन्या नव्या ‘ब्रॅण्ड्‍स’चे लाँचिंग करणार आहेत. प्रदर्शनातील स्टॉल्स बुकिंगला यंदाही उत्तम प्रतिसाद लाभला आहे. गेल्या वर्षी लाखाहून अधिक प्रगतिशील शेतकऱ्यांनी प्रदर्शनाला भेट दिली होती. कृषी क्षेत्रातील नवतंत्र प्रात्यक्षिकांसह समजावून घेण्यास या प्रदर्शनाचा उपयोग होतो.

Agri Expo 2025
Truffle Exhibition : कहाणी महागड्या पांढऱ्या ट्रफल शोधाची

यंत्र, नवतंत्र सर्वत्र

यंदाच्या कृषी प्रदर्शनात बागायती, कोरडवाहू तसेच संरक्षित शेतीमधील उपायांवर तंत्रज्ञान-यंत्रे शेतकऱ्यांना एकाच छताखाली पाहावयास मिळणार आहेत. कृषी शास्त्रज्ञ, संशोधक व अभ्यासकांना भेटता येणार आहे. शासनाचे विविध विभाग, कृषी संशोधन संस्था, नामवंत बॅंका, कृषी शिक्षण संस्था, बियाणे, खते, कीटकनाशके, हरितगृह उभारणी, यंत्रे व अवजारे क्षेत्रातील कंपन्या तसेच ट्रॅक्टर, पीक काढणी व कापणी यंत्रे, प्रक्रिया उद्योग, पॅकेजिंग, कोल्ड स्टोअर उद्योग, टिश्यू कल्चर, ठिबक व तुषार सिंचन उद्योगातील नामवंत कंपन्या या प्रदर्शनात सहभागी होत आहेत.

बक्षिसांची रोज सोडत!

राज्यातील हजारो प्रयोगशील शेतकरी या प्रदर्शनाला भेट देणार आहेत. यानिमित्ताने बक्षीस जिंकण्याची संधीही प्रत्येकाला मिळणार आहे. दररोज एका भाग्यवान शेतकऱ्याला या प्रदर्शनात ट्रॅक्टरचलित एक पेरणी यंत्र भेट मिळणार आहे. त्यासाठी सोडत काढली जाणार आहे.

प्रदर्शनातील वैशिष्ट्ये...

- नामांकित कंपन्या, संशोधन संस्थांचा सहभाग

- कृषी अवजारे, यंत्रे, ड्रीप, प्रक्रिया उद्योगांचा सहभाग

- बॅंका, खते, कीटकनाशके, बियाणे उद्योगांचे स्टॉल्स

- लोकप्रिय प्रदर्शनात सलग अकरा वर्षांपासून स्थान

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com