Agri Expo 2025 : अॅग्रोवन कृषी प्रदर्शनाची जय्यत तयारी

Agriculture Exhibition : राज्याच्या विविध भागांतील प्रगतिशील शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योजकांची उत्सुकता लागून असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’ भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरात जय्यत तयारी सुरू आहे.
Agri Expo 2025
Agri Expo 2025Agrowon
Published on
Updated on

Pune News : राज्याच्या विविध भागांतील प्रगतिशील शेतकऱ्यांसह कृषी क्षेत्रातील व्यावसायिक व उद्योजकांची उत्सुकता लागून असलेल्या ‘सकाळ-अॅग्रोवन’ भव्य ‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शनासाठी छत्रपती संभाजीनगरात जय्यत तयारी सुरू आहे. शुक्रवारपासून (ता. १०) सलग चार दिवस भरणाऱ्या या प्रदर्शनात कोरडवाहू व बागायती शेतीमधील नवतंत्रज्ञान, यंत्रे-अवजारांची रेलचेल बघण्यास मिळणार आहे.

अॅग्रिकोन न्यूट्रिटेक या प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक आहेत. तसेच सहप्रायोजक म्हणून एन्झोकेम अॅग्रो केमिकल इंडस्ट्रीज, पवन अॅग्रो, पितांबरी अॅग्रो केअर डिव्हिजन, बी. जी. चितळे डेअरी, आत्मा (अॅग्रिकल्चर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी), मेडा (महाऊर्जा), एमएआयडीसी या प्रदर्शनात सहभागी होत आहेत. यंदा प्रदर्शनाचे गिफ्ट स्पॉन्सरर्स म्हणून रोहित कृषी इंडस्ट्रीज, इफ्को (इंडियन फार्मर्स फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव्ह लिमिटेड) या नामांकित संस्था पुढे आल्या आहेत.

Agri Expo 2025
Siddheshwar Agricultural Exhibition : सोलापुरात श्री सिद्धेश्वर मंदिर देवस्थानच्या वतीने यंदाही कृषी प्रदर्शनाचे आयोजन

छत्रपती संभाजीनगरमधील जालना रोडवरील केंब्रिज स्कूलजवळ असलेल्या श्रीराम मंदिर ट्रस्टच्या मैदानावर प्रदर्शन भरते आहे. १० ते १३ जानेवारीपर्यंत रोज सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत एकप्रकारे आधुनिक बळीराजाचा मेळाच येथे भरत असून प्रदर्शनासाठी सर्व दिवस विनामूल्य प्रवेश ठेवण्यात आला आहे.

‘अॅग्री एक्स्पो २५’ कृषी प्रदर्शनातील सहभागासाठी देशातील व राज्यातील नामांकित कंपन्या, संशोधन संस्था, तसेच कृषी अवजारे, यंत्रे, ठिबक, प्रक्रिया उद्योगांची तयारी सुरू आहे. या कंपन्यांचा सहभाग शेतकऱ्यांना प्रेरणादायी ठरतो. शेतीतील नवतंत्र, प्रयोगांविषयी माहिती देणारे तज्ज्ञ, प्रतिनिधी तसेच शासकीय अधिकारीदेखील या प्रदर्शनात भेटणार आहेत.

Agri Expo 2025
Truffle Exhibition : कहाणी महागड्या पांढऱ्या ट्रफल शोधाची

विविध बॅंकांसह खते, कीटकनाशके, बियाणे क्षेत्रातील निविष्ठा उद्योगांचे भरगच्च स्टॉल्स या प्रदर्शनात दिसणार आहेत. ‘सकाळ-अॅग्रोवन’कडून सलग अकरा वर्षांपासून दर्जेदार कृषी प्रदर्शने आयोजित केली जात आहेत. या प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतकऱ्यांना ट्रॅक्टरचलित एक पेरणी यंत्राचे बक्षीस जिंकण्याची संधी मिळणार आहे. कारण दररोज एका भाग्यवान शेतकऱ्याला सोडत काढून पेरणी यंत्र भेट दिले जाणार आहे.

संभाजीनगरात होत असलेल्या यंदाच्या ‘अॅग्री एक्स्पो २५’ला किमान एक लाखाच्या आसपास प्रगतिशील शेतकरी भेट देण्याची शक्यता आहे. यंदा प्रदर्शनातील स्टॉल्स बुकिंगला उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे प्रदर्शनस्थळी २०० हून अधिक स्टॉल्स साकारत आहेत. त्यापैकी अर्ध्याहून अधिक स्टॉल्स कृषी संलग्न कंपन्यांचे असतील. प्रदर्शनाला मिळणारा नेहमीचा प्रतिसाद, शेतकऱ्यांमधील उत्साह तसेच कोट्यवधी रुपयांची उलाढाल अपेक्षित ठेवत अनेक कंपन्या नवनवीन उत्पादने प्रथमच ‘अॅग्रोवन’च्या प्रदर्शनात सादर करतात. यंदादेखील काही कृषी कंपन्या नव्या ‘ब्रॅण्ड्‍स’चे लॉंचिंग करण्याची जोरदार तयारी करीत आहेत.

शेतकऱ्यांना लढण्यासाठी बळ देणारा उपक्रम

शेतीत एकाचवेळी असंख्य समस्यांशी तोंड द्यावे लागते. त्यामुळे शेतकरी नाऊमेद होतात. अशावेळी ‘अॅग्रोवन’चे प्रदर्शन शेतकऱ्यांना या समस्यांशी जिद्दीने लढण्याचा मंत्र देते. त्यांना शेतीमधील नवतंत्राचे बळ मिळवून देते. आधुनिक तंत्रप्रणाली, सोपे प्रयोग, नवी उत्पादने याची माहिती या प्रदर्शनातून मिळते. त्या आधारे आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांनी आपली शेती पुन्हा फुलवली असून शेतशिवारात समृद्धीची गंगा आणली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com