Remuneration Issue : ग्रामपंचायत संगणक परिचालक मानधनाविना

Computer Operator : नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याने त्यांच्या संसाराचा गाडा सध्या उधारीवर सुरू आहे.
Computer Operator
Computer OperatorAgrowon

Nagpur News : नागपूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत संगणक परिचालकांचे मानधन गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असल्याने त्यांच्या संसाराचा गाडा सध्या उधारीवर सुरू आहे. मानधन देताना संबंधित यंत्रणेने संगणक परिचालकांचा अंत पाहू नये, असा इशाराही या वेळी दिला. तातडीने मानधन खात्यावर जमा करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

Computer Operator
Agriculture Subsidy : ई-केवायसी केल्यानंतरही अनुदान मिळण्यास विलंब

राज्यात ग्रामपंचायतीमध्ये कार्यरत असलेल्या संगणक परिचालकांचे मागील पाच ते सहा महिन्यांपासून मानधन कंपनीने न केल्याने संगणक परिचालकांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यातील ग्रामपंचायती ऑनलाइन करण्यात आल्या आहे. जन्म-मृत्यू आणि इतर दाखलेसुद्धा ग्रामपंचायतीमधून देण्यात येत आहेत. हे दाखले देण्यासाठी संगणक परिचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

त्यांना दरमहा शासनाकडून मानधन देण्यात येते. मात्र, यांचे मानधन काढण्याचे काम कंत्राटदार एजन्सीकडे देण्यात आले आहे. परिचालकांना महिना ६ हजार ९०० रुपये मानधन देण्यात येते. शासकीय कर्मचाऱ्यांचे पगार ५० हजारांवर असताना मात्र, संगणक परिचालकांना ६,९०० रुपये देण्यात येत आहे.

Computer Operator
Kharif Season : कोल्हापुरात खरिपाचे २ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र

परिचालकांचे मानधन हे ग्रामपंचायतचे १५ वित्त आयोगामार्फत १२ हजार महिना याप्रमाणे संपूर्ण वर्षाचे एकत्रित मानधन म्हणून जिल्हा परिषदेला आरटीजीएस प्रणालीद्वारे दिले जाते. मात्र प्रत्येकी संगणक परिचालकांना कंपनीकडून मानधनपोटी ६९०० दिले जाते, असा आरोप आहे.

वेतन न मिळाल्याने संगणक परिचालकांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून त्यांच्यासमोर उपासमारीची वेळ आली आहे. सरकारने तातडीने त्यांचे मानधन दिले नाही तर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.
राजानंद कावळे, कामगार व शेतकरी नेते

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com