Kharif Season : कोल्हापुरात खरिपाचे २ लाख ११ हजार हेक्टर क्षेत्र

Kharif Farming : गतवर्षीच्या दुष्काळामुळे खरिपाच्या क्षेत्रात वीस हजार हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे.
Kharif Farming
Kharif FarmingAgrowon

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यात यंदा खरिपाचे २ लाख ११ हजार १०० हेक्टर सर्वसाधारण क्षेत्र आहे. हवामान विभागाने यंदा अपेक्षित चांगल्या पावसाचा अंदाज दिला आहे. यामुळे आणि गतवर्षीच्या दुष्काळामुळे खरिपाच्या क्षेत्रात वीस हजार हेक्टरने वाढ होईल, असा अंदाज आहे. साधारण मे मध्ये अक्षय तृतीयेपासून जिल्ह्यात धूळवाफ पेरणीला सुरुवात होईल, अशी परिस्थिती आहे.

जिल्ह्यात या महिन्यात किरकोळ वळीव पाऊस झाला. पावसामुळे जमीन मशागतीसाठी उपयुक्त झाली आहे. जिरायत कोरडवाहू जमिनीवर बांधबंधिस्ती कामाला सुरुवात झाली आहे. मेमध्ये अक्षय तृतीयेपासून धूळवाफ पेरणीला सुरुवात होईल, असे चित्र आहे.

Kharif Farming
Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

जिल्ह्यात या महिन्यात किरकोळ वळीव पाऊस झाला. पावसामुळे जमीन मशागतीसाठी उपयुक्त झाली आहे. जिरायत कोरडवाहू जमिनीवर बांधबंधिस्ती कामाला सुरुवात झाली आहे. मेमध्ये अक्षय तृतीयेपासून धूळवाफ पेरणीला सुरुवात होईल, असे चित्र आहे.

खरिपामध्ये गतवर्षी १ लाख ८७ हजार ५८४ हेक्टर, म्हणजे ९७ टक्के क्षेत्र पेरणी झाली होती. त्यापासून ४ लाख ५९ हजार टन अन्नधान्याचे व गळीत धान्य पिकाचे उत्पादन मिळाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने भात, नागली, ज्वारी, मका, कडधान्ये, भुईमूग व सोयाबीन या प्रमुख पिकांचा समावेश आहे. यावर्षी १,८८,४०० हेक्टर क्षेत्र ऊस पीक असून एक कोटी ८८ लाख चारशे उसाचे उत्पादन मिळेल, म्हणजे हेक्टरी १०० टन उत्पादक मिळेल, असा अंदाज आहे.

Kharif Farming
Kharif Review Meeting : पेरण्याआधी बियाणे, खते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा

बियाणे, रासायनिक खते

बीयाणे व रासयनिक खते यांचे नियोजन कृषी खात्याने केले आहे. खरीप हंगामासाठी ८५ हजार ३११ टन खतसाठा उपलब्ध असून एक लाख ४९ हजार टन खतसाठा मंजूर झाला आहे. बियाण्यांमध्ये भात २३९४० क्विंटलची मागणी असून ९०० क्विंटल उपलब्ध झाले आहे. ज्वारी ४४, तूर २३, मूग ६२, उडीद ७९, भुईमूग २२५६, मका ६३, नाचणी ४३, सोयाबीन ११२६१ क्विंटलची मागणी असून २५० क्विंटल सोयाबीन उपलब्ध आहे.

खरीप पिकांचे उद्दिष्ट वाढवून आले आहे. चांगला पाऊस झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये. खते, बियाणे अधिकृत परवानाधारक दुकानदारांकडून घ्यावे. सोयाबीन बियाण्यांची उगवणक्षमता तपासून पेरणी करावी. खते, बियाण्यांच्या उपलब्धतेचे नियोजन केले असून गुणवत्तापूर्ण निविष्ठा मिळण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत.
अरुण भिंगारदेवे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com