PM-KMY : 'किसान मानधन योजने'त फक्त गुंतवा महिना ५५ रूपये आणि मिळवा ३००० रूपये पेन्शन

PM Kisan Mandhan Yojana : प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) अंतर्गत, शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते. यासाठी फक्त शेतकऱ्यांना प्रति महिना फक्त ५५ रूपये भरावे लागतात.
PM-KMY
PM-KMY Agrowon
Published on
Updated on

Pune News : देशात लोकसभा निवडणूकांचे बिगूल वाजणार आहेत. त्याअनुशंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मतदारास खूश करण्याचे काम सुरू केले आहे. तर केंद्रातील मोदी सरकारने देखील मध्यमवर्ग आणि शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या आहेत. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच काम करत असल्याचे भासवत आहे. याच्याआधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून आर्थिक मदत म्हणून वार्षिक ६००० हजार तीन टप्प्यात दिले जातात. तर आता वयाची ६० वर्षे पुर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसाठी सरकारकडून योजना आखण्यात आली आहे. केंद्र सरकारने 'किसान मानधन योजना' सुरू केली आहे. यामुळे वयस्क शेतकऱ्यांना इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.

काय आहे किसान मानधन योजना

प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM-KMY) ही शेतकऱ्यांसाठी आहे. तर ही योजना ६० वर्षे पुर्ण असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. ही योजना १२ सप्टेंबर २०१९ मध्ये करण्यात आली, ज्याचा उद्देश लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना (SMF) पेन्शनद्वारे सामाजिक सुरक्षा प्रदान करणे आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरमहा ३००० हजार रुपये देण्याची तरतूद आहे.

PM-KMY
PM Kisan Yojana : तुम्ही तर या चुका नाही करत ना…अन्यथा अडकू शकतो तुमचा हप्ता

तसेच जर लाभार्थी शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला दरमहा १५०० रुपये देण्याचीही तरतूद या योजनेत करण्यात आली आहे.

प्रति महिना फक्त ५५ रुपये प्रीमियम

या योजनेच्या लाभासाठी १८ ते ४० वयातील शेतकऱ्यांनी नोंदणी करायची असते. तसेच या योजनेसाठी फक्त प्रति महिना फक्त ५५ ते जास्तीत जास्त २०० रूपये प्रीमियम म्हणून भरायचे असतात. यानंतर ६० ओलांडल्यानंतर त्या शेतकऱ्यांना दरमहा ३००० रुपये पेन्शन दिली जाते.

PM-KMY
PM Kisan Samman Yojana : ‘त्या’ १२ लाख शेतकऱ्यांसाठी १५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम

छोट्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा

देशात अनेक समस्यांमुळे अन्नदाता आर्थिक संकटात सापडला आहे. तर तो निराश होईन मृत्यूला कवटाळत आहे. अशा वेळी 'किसान मानधन' योजना वयस्क शेतकऱ्यांना आधार देण्याचे काम करत आहे. तर योजनेचा लाभ अल्पभूधारक शेतकऱ्यांसह २ हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांनाच घेता येते.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी शेतकऱ्याकडे आधार कार्ड, मोबाईल क्रमांक, पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, वयाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, बँक खाते पासबुक असणे बंधनकारक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com