Crop Damage Compensation : नांदेड जिल्ह्यात सहा लाख शेतकऱ्यांना ७०४ कोटींचे वितरण

Heavy Rain Crop Loss : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.
Crop Damage
Crop Damage Agrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ मध्ये अतिवृष्टी, पूर परिस्थितीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शासनाकडून ८१२ कोटी रुपये नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. आजपर्यंत सहा लाख ४८ हजार २२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०४ कोटी ३६ लाख ७७ हजार रुपये रक्कम डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात आली. उर्वरित शेतकऱ्यांना रक्कम वाटपाचे काम चालू असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

नांदेड जिल्ह्यामध्ये एक ते तीन सप्टेंबर २०२४ या कालावधीत अतिवृष्टी झाली होती. यात खरिपातील जिरायती, बागायती व बहूवार्षिक पिकासह शेतजमिनीचे नुकसान झाले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाकडून ग्रामस्थरीय समितीमार्फत नुकसानीचे संयुक्त पंचनामे करण्यात आले. यात जिल्ह्यात पाच लाख ९६ हजार ५१७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.

Crop Damage
Crop Damage Compensation : अतिवृष्टिबाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा ; शासनाकडून १९३ कोटींचा निधी उपलब्ध; यंत्रणांकडून कासवगतीने कार्यवाही

हा फटका जिल्ह्यातील सात लाख ८३ हजार ९१५ शेतकऱ्यांना बसला होता. यात नुकसानग्रस्तांच्या भरपाईसाठी ८१२ कोटी ३८ लाख साठ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाची मागणी जिल्हा प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांकडे केली होती. या मागणीनुसार शासनाने नांदेडला ८१२ कोटींचा निधी मंजूर करून वितरित केला होता. यानंतर या निधीच्या वाटपाचे काम सुरू आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : ई-केवायसी नसल्याने २२ कोटींचा निधी पडून

भरपाई रक्कम मंजूर झालेल्या शेतकऱ्यांना व्हीके नंबर उपलब्ध करून देण्यात आला. या नंबरचे सत्यापन केल्यानंतर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा करण्याचे काम सुरू झाले. जिल्ह्यात आजपर्यंत सहा लाख ४८ हजार २२७ शेतकऱ्यांच्या खात्यावर ७०४ कोटी ३६ लाख ७७ हजार रुपये रक्कम डीबीटीद्वारे थेट जमा करण्यात आली आहे. वाटपाचे प्रमाण ८६.७० टक्के आहे.

अनुदान आणि क्षेत्र मर्यादेत वाढ

राज्य शासनाकडून यंदा जिरायतीसाठी साडेआठ हजारांवरून तेरा हजार पाचशे रुपये, बागायतीसाठी १७ हजारांवरून २७ हजार तर बहूवार्षिक पिकांसाठी २२ हजार पाचशे रुपयांवरून ३६ हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान वितरित करण्यात आले. तसेच अनुदान वाटपातील क्षेत्राची मर्यादाही दोन हेक्टरवरून तीन हेक्टर वाढविली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com