Foreign Study Tour
Foreign Study TourAgrowon

Foreign Study Tour : शेतकऱ्यांच्या परदेशी अभ्यास दौऱ्यासाठी १ कोटी ४० लाखांच्या निधीला मान्यता

International Educational Visit : शासन निर्णय राज्य सरकारने सोमवारी (ता.३) प्रसिद्ध केला आहे. परंतु २०२३-२४ मध्ये अभ्यास दौरा आयोजित न करता चालू वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी निधी मागणीला मान्यता देण्यात आली आहे.
Published on

Farmer Empowerment : राज्यातील १२० शेतकरी आणि ६ अधिकाऱ्यांच्या परदेश दौऱ्यासाठी १ कोटी ४० रुपयांचा निधीच्या प्रशासकीय खर्चाला मान्यता देण्यात आली आहे. २०२४-२५ मध्ये राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे आयोजित करण्यात आले होते.

त्याबद्दल शासन निर्णय राज्य सरकारने सोमवारी (ता.३) प्रसिद्ध केला आहे. परंतु २०२३-२४ मध्ये अभ्यास दौरा आयोजित न करता चालू वित्तीय वर्ष २०२४-२५ साठी निधी मागणीला मान्यता देण्यात आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना दरवर्षी विविध देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी शेतकऱ्यांचे दौरे आयोजित केले जातात. २००५ पासून ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये शेतमालाची निर्यात, कृषी माल प्रक्रिया तसेच विविध देशातील तंत्रज्ञान अवगत करण्याची संधी मिळते. तर त्याचा वापर शेतकरी शेतात करू शकतील, असा उद्देशही या दौऱ्यांमागे असतो.

संबंधित शेतकऱ्याची शेती असावी त्यांच्या ‘सातबारा’, आठ ‘अ’चा उतारा असावा तसेच त्याचे वय २१ ते ६२ च्या दरम्यान असावे. संबंधित शेतकऱ्याकडे पासपोर्ट असावा. तसेच तो शासकीय किंवा निमशासकीय नोकरीत नसावा. संबंधित शेतकऱ्याने पूर्वी शासकीय योजनेच्या माध्यमातून परदेश दौरा केलेला नसावा. तसेच संबंधित शेतकरी परदेश दौऱ्यासाठी पात्र असल्याचे मेडिकल सर्टीफिकेट आवश्यक आहे.

 Foreign Study Tour
Farmers Study Tour : मुळशीतील शेतकऱ्यांचा सातारा, कोल्हापुरात अभ्यास दौरा

परदेश दौऱ्यासंदर्भात कृषी विभाग लवकरच अधिकृत पत्राद्वारे जाहीर सूचना देणार असून. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा पुणे येथील कृषी संचालक, विस्तार व प्रशिक्षण यांच्याशी संपर्क साधता येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com