
Chhatrapati Sambhajinagar News: छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सदस्य आणि प्रसिद्ध उद्योगपती मधुकरराव हरिभाऊ मुळे (वय ८८) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (ता. १८) निधन झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील शिक्षण क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व, मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे माजी सरचिटणीस, उद्योगपती व छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेचे सचिव पद्माकरराव मुळे यांचे ते मोठे बंधू, तर सचिन मुळे, अजित मुळे यांचे वडील, तसेच समीर मुळे, रणजित मुळे यांचे ते ज्येष्ठ काका होत.
मूळचे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील बांदखेल येथील रहिवासी असलेले मुळे यांनी १९५६ मध्ये व्यवसायाच्या निमित्ताने छत्रपती संभाजीनगर (तेव्हाचे औरंगाबाद) येथे आले. पुस्तके व स्टेशनरी दुकानाच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायात पाऊल ठेवले. १९५८ मध्ये मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्थापनेत कै. विनायकराव पाटील यांच्या सोबत त्यांनी सक्रिय सहभाग दिला.
१९६२ मध्ये सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचे ते आजीव सभासद माजी कार्यकारिणी सदस्य बनले. १९६५ मध्ये कालवे, धरणे, आणि इमारत बांधकाम करणाऱ्या मुळे ब्रदर्स या कंपनीची स्थापना त्यांनी केली. १९७० मध्ये मुळे ब्रदर्स लिमिटेडचा विस्तार केला. १९७० मध्ये बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे छत्रपती संभाजीनगर येथे केंद्र उभारण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका व कार्य राहिले.
१९७८ मध्ये मराठवाडा इंडस्ट्रीज असोसिएशनचे ते कार्यकारिणी सदस्य होते. २००३ मध्ये मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. २००४ मध्ये मराठवाडा साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांची निवड झाली होती.
२००४ मध्ये इंडियन कौन्सिल ऑफ अग्रिकल्चर रिसर्च ॲडव्हायझरी कमिटी नार्म हैदराबादचे ते सदस्य झाले. जानेवारी २००४ मध्ये छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या ७७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले.
२००५ मध्ये जिल्हा शिक्षण संस्था चालक संघाचे ते अध्यक्ष बनले होते. प्रारंभापासूनच खा. शरद पवार यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. वक्तशीरपणा, नम्रता, सुसंस्कृतपणा हे त्यांच्यातील गुण, तर पुरोगामी विचाराचे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.