Indian Chess Champion: बुद्धिबळातील सुवर्णकन्या!

Divya Deshmukh: मराठी मुलीने बुद्धिबळ खेळात अगदी कमी वयात देशाचं उज्ज्वल केलेलं नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले जाईल आणि त्याचं सर्व श्रेय दिव्या देशमुखचे असेल.
Divya Deshmukh
Divya DeshmukhAgrowon
Published on
Updated on

पद्माकर उखळीकर

Women’s Chess World Cup: आपल्याकडे एखाद्या वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे म्हटले, की पालकांच्या कपाळावरील आठ्या अधिक आकुंचित होतात. आता कितीही महिलांनी विविध क्षेत्रात प्रगती केली असली तरी ते आपलं काम नाही हा सूर कुठेतरी निघतोच निघतो. आजकाल आयटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स जगात दररोज नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असताना प्रत्येक पिढीला वाटते आपल्या पाल्यांना आर्थिक पॅकेज मिळाले पाहिजे. म्हणून तांत्रिक शिक्षण घेण्याकडे पालकांचा किंवा आईवडिलांचा मुलांबाबत कल असतो.

पण शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची कधी मानसिकता पाहिली जाते का, हा प्रश्‍न कधी आईवडिलांनी स्वतःला विचारावा. आई किंवा वडील शिक्षक डॉक्टर असेल तर मुलांनी सुद्धा याच क्षेत्रात यावं, त्यासाठी मुलांना नाही ते करायला लावणारे आईवडील कमी नाहीत. मात्र महिला बुद्धिबळात विश्‍वविजेतेपद मिळविणारी दिव्या देशमुख हिने आणि तिच्या आईवडिलांनी जगाला एक आदर्श घालून दिला आहे. आईवडील दोघेही डॉक्टर असताना दिव्या देशमुख एका वेगळ्या म्हणजे डॉक्टरांच्या घरात बुद्धिबळ अशी कल्पना खरंच केली जाऊ शकेल?

पण, ते वास्तव देशमुख कुटुंबात आहे. आज भारतीयांना अभिमान वाटेल अशी कामगिरी दिव्या देशमुख या महाराष्ट्राच्या लेकीने केली आहे. आज मुलगी कोणात्याही क्षेत्रात पाय रोवून उभी राहिली असता ती कुटुंबाचं, गावाचं, शहराच, जिल्ह्याच, राज्याचं आणि देशाचं नाव करते. हे आपण समाजात पाहतोच कुटुंबाचं ते देशाचं नाव ती गाजवते. बुद्धीबळ या अनोख्या खेळांमध्ये मुलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

Divya Deshmukh
Women Farmer : महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी

तीन मुख्य कालखंड

महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या इतिहासात तीन मुख्य कालखंड आहेत. यामध्ये मेनचिक युग (१९२७- १९४४), सोव्हिएत -वर्चस्व युग (१९५०-१९९१) आणि चीन-वर्चस्व युग (१९९१ ते आत्तापर्यंत. वेरा मेनचिकने १९२७ ते १९४४ पर्यंत प्रत्येक महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली. सोव्हिएत युनियनने १९५० ते १९९१ पर्यंत प्रत्येक महिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धा जिंकली, विशेषतः जॉर्जियन चॅम्पियन नोना गॅप्रिंडाश्विली आणि माया चिबुरदानिड्झे, ज्यांनी सलग दहा जेतेपदे जिंकली, प्रत्येकी पाच सलग.

१९९१ पासून, चीनने गेल्या २१ पैकी १६ जेतेपदे जिंकली आहेत, जी सहा वेगवेगळ्या चॅम्पियन्समध्ये पसरलेली आहेत, ज्यात दोन चार वेळा विजेत्या झी जून आणि हौ यिफान आणि पाच वेळा विद्यमान विश्‍वविजेत्या जू वेनजुन यांचा समावेश आहे. या चॅम्पियनशिपमध्ये नेहमीच सामन्याचे स्वरूप वापरले जात नाही, त्याऐवजी ती राउंड -रॉबिन स्पर्धा म्हणून सुरू झाली. १९३७ मध्ये एकच चॅम्पियनशिप सामना खेळविण्यात आला आणि १९५० च्या दशकात चॅम्पियनशिपने सामन्याच्या स्वरूपाचा वापर केला.

हे २००० पर्यंत चालू राहिले, जेव्हा एक नवीन नॉकआऊट स्वरूप स्थापित करण्यात आले. २०११ मध्ये सामन्याचे स्वरूप नॉकआउट स्वरूपासह पर्यायी आधारावर परत आले आणि २०२० मध्ये नॉकआउट स्वरूप पूर्णपणे बदलले गेले. चार उच्च क्रमांकाच्या खेळाडूंना हरवून दिव्याने मोठा विजय मिळवला, हे सहसा घडत नाही. तिने एकाच स्पर्धेतून इतके काही मिळवले! हे कुणालाही शक्य नाही. त्यामुळे दिव्या देशमुख ही बुद्धीबळ खेळात येणाऱ्या तरुणींसाठी आदर्श ठेवला आहे.

Divya Deshmukh
Success Story: शेती,पर्यावरणाला दिशा देणाऱ्या योगेश्वरी चौधरी

दिव्या देशमुखचा जन्म ९ डिसेंबर २००५ मध्ये झाला म्हणजे विसाव्या वर्षी बुद्धिबळात विश्‍वविजेतेपद मिळविणारी चौसष्ट घरांची राणी ठरली आहे. भारतीय बुद्धिबळपटू म्हणून देशाला सार्थ अभिमान आणि एक मराठी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मान अजून ताठ करणारा क्षण आहे. तिला महिला ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर ही पदवी मिळाली आहे. तिने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये तीन वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. दिव्याने आशियाई अजिंक्यपद, जागतिक ज्युनिअर अजिंक्यपद तसेच जागतिक युवा अजिंक्यपद स्पर्धेत अनेक सुवर्णपदके जिंकली आहेत.

दिव्याचा जन्म नागपूर येथे एका मराठी कुटुंबात झाला. तिचे आई-वडील जितेंद्र देशमुख आणि नम्रता देशमुख हे दोघेही व्यवसायाने डॉक्टर. २०२१ मध्ये दिव्या देशमुख भारताची २१ वी महिला बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनली. तिने २०२२ ची महिला भारतीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. तिने २०२२ च्या बुद्धिबळ ऑलिंपियाडमध्ये वैयक्तिक कांस्य पदकही जिंकले. ती सुवर्णपदक विजेत्या फिडे ऑनलाइन बुद्धिबळ ऑलिंपियाड २०२० संघाचाही भाग होती.

डिसेंबर २०२४ रोजी, ती भारतातील दुसऱ्या क्रमांकाची महिला बुद्धिबळपटू आहे. २०२३ मध्ये अल्माटी येथे तिने आशियाई महिला बुद्धिबळ अजिंक्यपद जिंकले. त्यानंतर तिने टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धेत सर्वांत शेवटचे सीडिंग असूनही महिलांच्या रॅपिड विभागात पहिले स्थान पटकावले. या स्पर्धेत तिने हरिका द्रोणवल्ली, वंतिका अग्रवाल, कोनेरू हम्पी, सविता श्री बी, इरिना क्रश आणि निनो बत्सियाश्‍विली यांना पराभूत केले, महिला विश्वविजेत्या जू वेंजुन आणि ॲना उशेनिना यांच्याविरुद्ध बरोबरी साधली आणि पोलिना शुवालोवा हिच्याकडून तिचा एकमेव पराभव झाला.

मे २०२४ मध्ये, देशमुख शारजा चॅलेंजर्स स्पर्धेत विजेती ठरली, एक मोठी ओपन टुर्नामेंट जिंकल्याने तिला पुढच्या वर्षी शारजा मास्टर्समध्ये स्थान मिळाले. जूनमध्ये, ती २०२४ ची आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघ वर्ल्ड चॅम्पियन २० वर्षांखालील मुलींच्या स्पर्धेची विजेती बनली. २००१ मध्ये कोनेरू हम्पी, २००८ मध्ये हरिका द्रोणवल्ली आणि २००९ मध्ये सौम्या स्वामिनाथन यांच्यानंतर ती जागतिक ज्युनिअर मुलींचे विजेतेपद जिंकणारी चौथी भारतीय ठरली.

अंतिम फेरीत विजयाची आवश्यकता असताना, तिने पाच तासांच्या दीर्घ लढतीत बल्गेरियाच्या तिसऱ्या मानांकित बेलोस्लावा क्रॅस्टेवाला पराभूत करून संभाव्य ११ पैकी १० गुण मिळवले आणि सुवर्णपदक जिंकले. सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या ४५ व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये सांघिक सुवर्ण तसेच वैयक्तिक सुवर्णपदके जिंकली. कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख ह्यांच्यातील वर्ल्ड कप महिला बुद्धीबळ स्पर्धा जॉर्जिया येथे चालू आहे. दोघींमध्ये पहिला व दुसरा डाव बरोबरीत सुटला.

आजच्या तिसऱ्या डावात दिव्या देशमुख ही विजेती ठरली आहे आणि वर्ल्ड कप तिच्या नावावर झाला आहे. वर्ल्ड कप विजेता आणि उपविजेता दोन्ही भारतीय महिला हा सुद्धा योगायोग म्हणता येईल. या दोन्ही भारतीय लेकींचे कौतुक तर दिव्या देशमुखचे वर्ल्ड कप विजेतेपद अभिमान आणि कौतुकास्पद आहे. महाराष्ट्रातील मराठी मुलींमध्ये पुढे दिव्या देशमुख दिसतील. त्यामुळे दिव्या देशमुखने या विजयाने आदर्श ठेवला आहे. दिव्याचे कौतुक करावे तेवढे कमीच!

: ९९७५१८८९१२

(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com