Women Farmer : महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या शेतमालाची निर्यात प्रेरणादायी

UMED Maharashtra : महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे.
UMED Maharashtra
UMED Maharashtra Agrowon
Published on
Updated on

Solapur News : महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनी, स्वयंसहाय्यता बचत गट यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळण्यासाठी आणि ग्रामीण महिलांचे जीवन समृद्ध होण्यासाठी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान कार्यरत आहे.

महिला बचत गटाच्यां महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने शेतीमालाची होत असलेली निर्यात ही निश्‍चित प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले.

उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, टेकनोसर्व आणि केडी एक्स्पोर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील साऊली शेतकरी महिला उत्पादक कंपनीने केळी इराण येथे निर्यात करण्यात केली.

जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उमेद अभियान अंतर्गत स्थापन केलेल्या सावली महिला शेतकरी उत्पादक कंपनीच्या वतीने नुकतीच २१ टन केळी इराण या देशात निर्यात करण्यात आली.

UMED Maharashtra
Women Self-Help Group : पाच दिवसाच्या प्रदर्शनात महिला बचतगटांचा हिरमोड

या वेळी उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, जिल्हा व्यवस्थापक संतोष डोंबे, टेकनोसर्व्हचे मृत्युंजय, चंद्रविर,KD एक्स्पोर्टचे किरण डोके, तालुका अभियान व्यवस्थापक अवधूत देशमुख, सुषमा बिचुकले, साऊली शेतकरी उत्पादक कंपनीच्या संचालक प्राजक्ता पोरे, दीपाली पंढरे, सुवर्णा खबाले, मुक्ता सोमासे, तबस्सुम शेख, मनीषा बोराडे उपस्थित होत्या.

मुख्य कार्यकारी अधिकारी जंगम म्हणाले, कीअभियानाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय उल्लेखनीय असून उमेद अभियानाच्या अंतर्गत कार्यरत महिलांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. आपणही त्यासाठी पाठपुरावा करु, असेही ते म्हणाले. या वेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोहिनकर म्हणाले, की शेतीमाल निर्यात करण्यासाठी व महिलांनी एकत्रित येऊन खरेदी केलेल्या शेतीमाल यांना चांगला दर मिळणार असल्याचे कंपनीला चांगला नफा मिळणार आहे.

UMED Maharashtra
Self-Help Group : सोलापूर जिल्ह्यातील आठ हजार ६९५ बचत गटांना ४१८ कोटींचे कर्ज

तसेच यामुळे महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपन्या सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे, असे ते म्हणाले. साऊली शेतकरी महिला कंपनीच्या श्रीमती मनीषा बोराडे म्हणाल्या, की केळी उत्पादन स्थानिक बाजारपेठेपेक्षा जास्त दराने निर्यात होत असल्यामुळे सर्व महिलांना आनंद होत आहे. त्यामुळे भविष्यात कंपनीच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतीमाल निर्यात करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

प्रकल्पाला लवकरच मंजुरी

साऊली महिला शेतकरी उत्पादक कंपनीला मूल्यवर्धन साखळी अंतर्गत केळी प्रक्रिया उद्योगासाठी प्रकल्प मंजूर आहे. तसेच स्मार्ट प्रकल्प अंतर्गत सदर कंपनीचा प्रकल्प राज्य कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला असून, तो मंजूर झाल्यास केळी प्रक्रियेसाठी आणखी मदत मिळून कंपनीच्या माध्यमातून महिलांना व्यवसायासाठी मोठे व्यासपीठ मिळणार आहे, असे श्री. कोहिणकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com