Gold Rate : सोन्याच्या किंमतीत घट; लग्नसराईत ग्राहकांना दिलासा

Gold Market : बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९४ हजार ७० रुपयांवर आला आहे. तर २२ कॅरेटचा प्रति तोळा दर ८६ हजार २३१ रुपये आहे. तसेच चांदीचा प्रति किलो दर ९६ हजार ८८० रुपयांवर आला आहे.
Gold Rate
Gold Rate Agrowon
Published on
Updated on

Gold Market Rate Today : ऐन लग्नसराईमध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला झळ बसली. ग्रामीण भागात लग्नसराईमुळे सोन्याची मागणी वाढते. तसेच गुंतवणूकीसाठी सोने खरेदी केली जाते. २२ एप्रिल रोजी सोन्याचा दर प्रति तोळा १ लाख २ हजार ७३ रुपयांपर्यंत पोहचला होता. परंतु सराफा बाजारात बुधवारी (ता.१४) सोन्याचा प्रति तोळा दर ९६ हजार ५९३ रुपयांवर आला आहे. त्यामुळे मागील तीन आठवड्यात सोन्याचे दर साडे पाच हजार रुपयांनी घसरले आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी झाल्यामुळे जागतिक बाजारात घडामोडीनं वेग घेतला आहे. बुलियन मार्केटच्या वेबसाईटनुसार २४ कॅरेट सोन्याचे दर प्रति तोळा ९४ हजार ७० रुपयांवर आला आहे. तर २२ कॅरेटचा प्रति तोळा दर ८६ हजार २३१ रुपये आहे. तसेच चांदीचा प्रति किलो दर ९६ हजार ८८० रुपयांवर आला आहे.

Gold Rate
Jagdamba Devi Gold Crown : अहिल्यानगर जिल्ह्यातील जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

जीएसटी, टीसीएस आणि इतर कर वगळता नागपूर, पुणे, नाशिक, मुंबई या शहरांमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति तोळा ९३ हजार ९०० रुपये आहे. तर २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति तोळा ८६ हजार ७५ रुपये इतकी आहे.

दरम्यान, सोन्याचे दर कमी होण्यामागे जागतिक बाजारातील घडामोडी असल्याचं जाणकार सांगतात. अमेरिकेच्या मध्यवर्ती बँक म्हणजेच फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढण्याच्या शक्यता आहे. त्यामुळे डॉलर मजबूत झाला आहे. त्याचा परिणाम सोन्यांच्या किंमतीवर झाला. तसेच जागतिक बाजारात सोन्याच्या किमतीत थोडी घट झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com