Jagdamba Devi Gold Crown : अहिल्यानगर जिल्ह्यातील जगदंबा देवीला दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट

Gold Crown : अहिल्यानगर जिल्ह्यातीळ कर्जत तालुक्यात तेराशे वर्ष प्राचीन असणाऱ्या या मंदिराची विशेष ओळख आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचं मंदिर अशी ओळख या मंदिराला आहे.
Jagdamba Devi Gold Crown
Jagdamba Devi Gold Crownagrowon
Published on
Updated on

Jagdamba Devi Temple in Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये दोन किलो वजनाचा सोन्याचा मुकुट सेवा संस्थेचे अध्यक्ष विजयराव देशमुख यांच्या हस्ते बसवण्यात आला. यावेळी विधिवत पूजा करण्यात आली. जगदंबा देवी सेवा संस्थांच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. कर्जत तालुक्यातील राशीन येथील श्री जगदंबा देवी मंदिरामध्ये शतचिंडी महोत्सव सुरू आहे. या महोत्सवानिमित्त राशीनमध्ये सोन्याच्या मुकूटाची मिरवणूक काढण्यात आली.

अहिल्यानगर जिल्ह्यातीळ कर्जत तालुक्यात तेराशे वर्ष प्राचीन असणाऱ्या या मंदिराची विशेष ओळख आहे. देशाच्या दक्षिणेकडील राज्यांमध्ये प्राचीन देवीचं मंदिर अशी ओळख या मंदिराला आहे.

Jagdamba Devi Gold Crown
Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेत परप्रांतीय महिला; १ हजारपेक्षा जास्त बोगस खाती उघड

यावेळी श्री जगदंबा संस्थेचे अध्यक्ष विजयराव देशमुख म्हणाले, "राशीन येथील जगदंबा देवीचं मंदिर राज्यामध्ये प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. या मंदिराला मोठा इतिहास आहे. देशातील व राज्यातील अतिशय पुरातन व देखणे असं मंदिर आहे. स्वर्गीय बापूसाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून सेवा संस्थेची स्थापना झाली."

यावेळी देशमुख यांनी मंदिरामधील सोहळ्याबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, "आज मंदिरामध्ये सोन्याचा कळस आणि दोन किलो वजनाचा देवीचा सोन्याचा मुकुट प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न झाला. तसेच या निमित्ताने शतचंडी यज्ञ सोहळा सप्तशती पाठ यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या सर्व कार्यक्रमासाठी लाखोच्या संख्येने भाविकांनी येऊन दर्शन घेतलं." असंही देशमुख म्हणाले.

दरम्यान, या सोहळ्यासाठी हजारो नागरिकांनी उपस्थिती लावली. तसेच शतचिंडी यज्ञ सोहळा व सहस्त्र प्राकृतिक सप्तशती पाठ सोहळा यासाठी हजेरी लावली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com