
Ahilyanagar News : पर्यावरण रक्षणासाठी महावितरणने टाकलेल्या पाऊलाला महावितरणच्या अहिल्यानगर मंडळातील १८ हजार ८९५ पर्यावरणस्नेही ग्राहकांनी पुढाकार घेतला आहे. छापील वीजबिल नाकारत ऑनलाइन सेवेच्या पर्यायाचा वापर करत आहेत.
महावितरणच्या गो-ग्रीन सेवेचा लाभ घेतला आहे. त्यामुळे गो-ग्रीन नोंदणी केलेल्या प्रत्येक ग्राहकाची वार्षिक १२० रुपये या प्रमाणे एकूण १८ हजार ८९५ ग्राहकांची २२ लाख ६७ हजार ४०० रुपये इतकी वार्षिक बचत होत असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. अहिल्यानगर मंडळातील वीजग्राहकांची २२ लाखांची यातून वार्षिक बचत होत आहे.
अहिल्यानगर मंडलातील ग्राहकांना सरळ सोप्या पद्धतीने गो-ग्रीन नोंदणी कशी करावी तसेच गो-ग्रीन नोंदणी केल्यानंतर मिळणारे फायदे दर्शविणारे पोस्टर्स तयार करण्यात आले आहे. या पोस्टर्सवर गो ग्रीन माहिती व सोबत या संदर्भातील व्हिडिओचा क्यूआर कोड देण्यात आलेला आहे. ग्राहकांनी मोबाइल च्या माध्यमातून सदर क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर चित्रफितीच्या माध्यमातून गो-ग्रीन नोंदणी कशी करावी या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
वीजबिलासाठी ई-मेल व एसएमएसचा पर्याय निवडल्याने या ग्राहकांना दर महिन्याला प्रत्येक वीजबिलामागे १० रूपयाची सुट देण्यात येत आहे. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महावितरणकडून ‘गो-ग्रीन’ योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये वीज बिलाच्या छापील कागदाऐवजी फक्त ई-मेल व एसएमएस चा पर्याय निवडल्यास वीज ग्राहकांना प्रति बिलात दहा रुपये सवलत देण्यात येत आहे.
त्यामुळे वीज बिलामध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होणार आहे. वीज ग्राहकांना छापील वीज बिलांची गरज भासल्यास त्यांना ई-मेल द्वारे प्राप्त झालेले दर महा वीजबिल संगणकात सॉफ्ट कॉपीमध्ये जतन करून ठेवता येईल. सोबतच महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेत स्थळावर चालू वीजबिल यासह मागील अकरा महिन्याचे असे एकूण बारा महिन्याचे वीज बिले मूळ स्वरूपात उपलब्ध आहेत. आवश्यकतेप्रमाणे वीज ग्राहकांना ते कधीही डाऊनलोड करण्याची किंवा मूळ स्वरूपात रंगीत प्रिंट करण्याची सोय आहे.
महावितरण ‘गो-ग्रीन’ योजनेचा पर्याय निवडण्यासाठी ग्राहकांनी वीज बिलावर छापलेल्या जीजीएन या क्रमांकाची नोंदणी महावितरण मोबाइल अॅपद्वारे किंवा संकेतस्थळाच्या https://billing.mahadiscom.in/gogreen.php लिंक वर जाऊन करावी. या बाबतची अधिक www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
गो ग्रीन नोंदणी केलेले ग्राहक
अहिल्यानगर ग्रामीण २३३७
अहिल्यानगर शहर ७१९६
कर्जत १६१९
संगमनेर ४९८१
श्रीरामपूर २७६२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.