
Pune News : गेल्या काही वर्षापासून ‘गो ग्रीन’ योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. वीजबिलांसाठी छापील कागदाचा वापर पूर्णपणे बंद करून महावितरणच्या ‘गो ग्रीन’ योजनेअंतर्गत बिलासाठी केवळ ई-मेल व ‘एसएमएस’चा पर्याय निवडणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे.
याअंतर्गत पुणे प्रादेशिक विभागातील पर्यावरणस्नेही ग्राहकांनी आजअखेर तब्बल दोन लाखांचा टप्पा गाठला आहे. पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांतील २ लाख ११३ वीजग्राहकांनी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करून या पर्यावरणपूरक योजनेला पसंती दिली आहे.
‘गो-ग्रीन’ योजनेमुळे या ग्राहकांना मिळून वार्षिक २ कोटी ४० लाख १३ हजार ५६० रुपयांचा फायदा होत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत ५ लाख २४५ पर्यावरणस्नेही वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत. यात सर्वाधिक म्हणजे ४० टक्के प्रतिसाद पुणे प्रादेशिक विभागात मिळाला असून, राज्यात महावितरणच्या १६ परिमंडलांमध्ये सर्वाधिक पुणे परिमंडलामध्ये १ लाख ३४ हजार वीजग्राहक या योजनेत सहभागी झाले आहेत.
महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेनुसार छापील वीजबिलाच्या कागदाऐवजी फक्त ‘ई-मेल’ व ‘एसएमएस’चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. या सवलतीमुळे अधिकाधिक नागरिक ग्रो ग्रीनला प्रतिसाद देत असून, अनेकांनी वेगवेगळ्या यूपीआय अॅपच्या माध्यमातून, तसेच बँकेच्याही ॲपवरून महिन्याचे वीजबिल भरण्यास सुरवात केली आहे.
सहभागी ग्राहक संख्या
‘गो-ग्रीन’ योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ४३ हजार ३६८ ग्राहक सहभागी झाले आहेत. त्यांचा १ कोटी ७२ लाख ४ हजार १६० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. सातारा जिल्ह्यातील १३ हजार ग्राहकांना १५ लाख ७८ हजार ३६० रुपये, सोलापूर जिल्ह्यातील १४ हजार २३१ ग्राहकांना १७ लाख ७ हजार ७२० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १८ हजार ४५ ग्राहकांना २१ लाख ६५ हजार ४०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील ११ हजार ३१६ ग्राहकांना १३ लाख ५७ हजार ९२० रुपयांचा वीजबिलांमध्ये वार्षिक फायदा होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.