
Akola News: मागील काही वर्षांपासून जागतिक हवामान बदल ही एक जागतिक समस्या म्हणून उदयास आली आहे. याचे दृश्य -अदृश्य परिणाम संपूर्ण विश्वाला भोगावे लागत आहेत. वाढते प्रदूषण आणि हवामान बदल रोखण्यासाठी जागतिक पातळीवर अनेक देश एकत्र येऊन काम करीत आहेत. जागतिक हवामान बदलाने तिसऱ्या हरित क्रांतीचे बीजारोपण झाले असल्याचे महत्त्वपूर्ण प्रतिपादन कर्नाटक राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष, राष्ट्रीय कोरडवाहू प्राधिकरण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक दलवाई यांनी केले.
हरित क्रांतीचे प्रणेते (कै.) वसंतराव नाईक यांच्या स्मृती प्रीत्यर्थ डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात ‘शेती प्रणालींच्या पुनरुज्जीवनासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर’ या विषयावरील दोनदिवसीय राष्ट्रीय परिसंवादाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर नागपूर येथील राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि जमीन वापर नियोजन संस्थेचे संचालक डॉ. एन. जी. पाटील,
जबलपूर येथील राष्ट्रीय तण संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. जे. एस. मिश्रा, सेंद्रिय शेती संशोधन संस्था (फिबल) स्वित्झर्लंडच्या संशोधक डॉ. आकांक्षा सिंग, पीपल अँड नेचरचे (इडीएफ) भारताचे मुख्य सल्लागार डॉ. निखिल गोवेस, युनिव्हर्सिटी ऑफ मेरी लँड सेंटर फॉर एन्व्हायर्न्मेंट सायन्सचे (यूएमसीइएस) प्राध्यापक डॉ. इरिक डेव्हिडसन (अमेरिका), इकोसर्ट इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल जाधव,
मुंबईच्या भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरच्या न्यूक्लियर ॲग्रिकल्चर आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ, विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. अनिता चोरे, डॉ. टी. एच. राठोड, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय सोनी (पुसद), मार्गदर्शक गोविंद फुके यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. पुसद येथील वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या सहयोगाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, की बदलत्या जागतिक परिस्थितीत देशांतर्गत शेती शाश्वत आणि शेतकरी संपन्न होण्यासाठी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाद्वारे काल सुसंगत संशोधन निरंतरपणे सुरू आहे. यामध्ये विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय संस्थांचा देखील सहभाग घेण्यात येत आहे. हवामान बदलाच्या काळात शेतकरी टिकला पाहिजे, या अनुषंगाने तंत्रज्ञान, पिकवाण, शिफारशी देण्याचे काम सुरू केले आहे.
उद्घाटन सोहळ्यात डॉ. मिश्रा, डॉ. पाटील, डॉ. आकांक्षा सिंग, डॉ. बल्लाळ, श्री. सोनी यांनीही मनोगत व्यक्त करीत हवामान बदलाच्या काळात या चर्चासत्राला अनन्य साधारण महत्त्व असल्याचे सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे यांनी आयोजनाची पार्श्वभूमी सविस्तर मांडली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहयोगी प्रा. डॉ. नितीन कोंडे यांनी केले. तर डॉ. अनिता चोरे यांनी आभार मानले.
आज समारोप
या चर्चासत्राचा बुधवारी (ता. १२) समारोप होणार आहे. राष्ट्रीय परिसंवादात एकूण २७४ संशोधनात्मक लेख प्राप्त झाले असून, सहभागी संशोधकांपैकी दोन उत्कृष्ट संशोधन कार्याला वसंतराव नाईक स्मृती सुवर्ण पदक देऊन गौरविण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.