Farmer Issues: शेतकऱ्यांच्या जागतिक समस्यांची स्थानिक पातळीवर सोडवणूक शक्य

Hydrologist Rajendra Singh: भारतात वातावरणीय बदलामुळे ढग नाहीसे होत आहेत. नैसर्गिक पाण्याचे स्रोत मर्यादित होत असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. वातावरणीय बदल ही समस्या जागतिक असली, तरी त्याचे उत्तर स्थानिक पातळीवर शोधले जाऊ शकते.
Hydrologist Rajendra Singh
Hydrologist Rajendra SinghAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: भारतात वातावरणीय बदलामुळे ढग नाहीसे होत आहेत. नैसर्गिक पाण्याचे स्रोत मर्यादित होत असून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फटका बसत आहे. वातावरणीय बदल ही समस्या जागतिक असली, तरी त्याचे उत्तर स्थानिक पातळीवर शोधले जाऊ शकते. शेतकऱ्यांनी आपली पीक पद्धती पाऊस पद्धतीशी अनुरूप करून घेतली तरच शेतकरी जगू शकतो, असे प्रतिपादन जलतज्ज्ञ राजेंद्र सिंग यांनी अलिबाग येथे बुधवारी केले.

ग्लोबल विकास ट्रस्टच्या वतीने आयोजित कृषी क्षेत्रावरील मंथन या चर्चासत्राच्या उद्‌घाटन समारंभात ते बोलत होते. ट्रस्टच्या वतीने राष्ट्र उभारणीसाठी जागतिक संवाद या परिसंवादांतर्गत ‘पर्यावरणीय बदलाचे शेतीवरील परिणाम, ग्रामीण विकासातील संधी’ या विषयावर तज्ज्ञांनी मते व्यक्त केली.

Hydrologist Rajendra Singh
Farmer Issue : सरकारी योजनांसाठी धोंडिबाची वणवण

या वेळी राजेंद्र सिंह यांनी शेती, पाणी आणि सरकारी धोरणांवर मते व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘सध्या जगातील १२७ देशांतील लोकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्या देशांतील लोक पाण्यासाठी परागंदा होत आहेत. तीच वेळ भारतावर पुढील चार-पाच वर्षांत येईल की काय अशी अवस्था आहे.

आफ्रिकन देशांतील नागरिक पाण्यासाठी परागंदा होत आहेत. त्यांना युरोपियन देश क्लायमेट रेफ्युजी म्हणतात. भारतीय लोक सर्व नियम तोडून क्लायमेट रेफ्युजी होतील त्या दिवसाची भीती वाटत आहे. सध्या पाण्याविना शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे.

Hydrologist Rajendra Singh
Farmer Issue: धान उत्पादकांचे ४१६ कोटींचे चुकारे रखडले; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

त्यांना पीक पद्धती, बियाणे, पाणी आणि शेतीसंबंधी काहीच कळेनासे झाले आहे. शेतीचा ॲग्रो बिझनेस झाल्यापासून शेतकऱ्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली. त्यांच्या समस्या जागतिक आहेत, त्यांची सोडवणूक स्थानिक पातळीवर केल्यास त्यातून सुटका होऊ शकते. ग्लोबल विकास ट्रस्टचे कृषिकुल हे त्याचे उदाहरण आहे.

ग्लोबल विकास ट्रस्टचे मयंक गांधी म्हणाले, ‘‘लोकशाहीत धोरण बदलले तर सामान्यांचे जीवन बदलू शकते अशी आमची धारणा होती. मात्र, अण्णा हजारे आणि आम आदमी पक्षाच्या वाटचालीनंतर भ्रमनिरास झाला. शेतीचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकतो. शेतीच्या शाश्वत विकसासाठी काम करणे गरजेचे आहे, हे जाणून आम्ही बीडमधील परळीत २५ एकर क्षेत्रावर विविध प्रयोग केले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com