Farmer Issue: धान उत्पादकांचे ४१६ कोटींचे चुकारे रखडले; शेतकऱ्यांमध्ये नाराजी

Agricultural Issues: धान उत्पादक शेतकऱ्यांचे ४१६ कोटी रुपयांचे चुकारे अद्यापही अडकून पडले आहेत. या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली असून, त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
Paddy
PaddyAgrowon
Published on
Updated on

Gondiya News : जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून हमीभाव केंद्रांवर शेतकऱ्यांकडून धानाची विक्री करण्यात आली. परंतु गेल्या दीड महिन्यांपासून ६० हजारांवर शेतकऱ्यांचे चुकारे थकित असल्याने शेतकऱ्यांसमोरील आर्थिक अडचणीत वाढ झाली आहे.

जिल्ह्यात खरिपानंतर रब्बी हंगामात सुद्धा धानाची लागवड मोठ्या क्षेत्रावर होते. त्यामुळे शेतकरी खरिपातील धानाची लवकर कापणी, मळणी करून त्याची विक्री करण्याला प्राधान्य देतात. या पैशातून रब्बी हंगामासाठी लागणाऱ्या निविष्ठांच्या खरेदीवर भर दिला जातो. त्यासोबतच उसनवारी चुकविली जाते.

Paddy
Paddy Pulses Registration : धान-भरडधान्य नोंदणीसाठी १५ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

यंदा शासकीय हमीभाव केंद्र उशिरा सुरू झाल्याने पैशाची गरज असलेल्या शेतकऱ्यांकडून खुल्या बाजारात धान विक्री करण्यात आली. व्यापाऱ्यांनी या संधीचे सोने करीत कमी दरात धानाची खरेदी केली. त्यानंतरच्या काळात शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली. याला सुमारे दोन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. या दरम्यान जिल्ह्यातील ७७,७७१ शेतकऱ्यांनी धानाची विक्री केली.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या माध्यमातून २१ लाख ७५ हजार ९० क्‍विंटल धानाची खरेदी करण्यात आली. फेडरेशनने खरेदी केलेल्या या धानाची एकूण किंमत ५०० कोटी २६ लाख रुपये आहे. यापैकी आतापर्यंत केवळ ८३ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत.

Paddy
Paddy Farming : शेततळ्यांच्या जोरावर दुबार भातशेती

उर्वरित ४१६ कोटी ६० लाख ६० हजार रुपयांच्या चुकाऱ्याची शेतकऱ्यांना गेल्या दीड महिन्यापासून प्रतीक्षा लागून आहे. शेतकरी आज-उद्या जमा होतील या अपेक्षेने शेतकरी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनसह बॅंकेत खेटे घालत आहेत. परंतु शासनस्तरावरून निधी न मिळाल्याचे सांगत त्यांची बोळवण केली जात आहे. विशेष म्हणजे थकित चुकाऱ्यांकरिता निधी मिळावा, अशी मागणी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सातत्याने केली जात आहे. आतापर्यंत चार ते पाच वेळा या संदर्भात शासनाला पत्र पाठविण्यात आले, अशी माहिती फेडरेशनच्या सूत्रांनी दिली.

दीड लाखावर शेतकऱ्यांची नोंदणी

शासकीय धान खरेदी केंद्रावर धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी सक्‍तीची आहे. त्यानुसार जिल्हयात १ लाख ४६ हजार १४१ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

...अशी आहे स्थिती

आतापर्यंत चुकारे : ८३ कोटी रुपये

धान खरेदी : २१ लाख ७५ हजार क्‍विंटल

धान विक्री करणारे शेतकरी : ७७,७७९

धानाची किंमत : ५२६ कोटी

थकित चुकारे : ४१६ कोटी ६० लाख रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com