Napane Glass Bridge: बारमाही वाहणाऱ्या नापणे धबधब्यावर काचेचा पूल

Napane Waterfall: जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नापणे (ता. वैभववाडी) धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. पर्यटन वृद्धीकरिता सिंधुरत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे.
Napane Glass Bridge
Napane Glass BridgeAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News: जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नापणे (ता. वैभववाडी) धबधब्यावर काचेचा पूल उभारण्यात आला आहे. पर्यटन वृद्धीकरिता सिंधुरत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजार रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून या पुलाचे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अशा पद्धतीने उभारलेले हा राज्यातील पहिला पूल ठरणार आहे.

सभोवताली हिरवीगर्द झाडी, पक्ष्यांचा किलबिलाट, ८० ते ९० फूट उंचावरून ओसंडून वाहणारे पाणी आणि त्यातून दवबिंदूंची होणारी उधळण म्हणजे बारमाही वाहणारा नापणे धबधबा असेच वर्णन या धबधब्याचे केले जाते.

Napane Glass Bridge
Bridge Collapse Risk: सांगवी सांडस बंधारा धोकादायक

येथे एक मोठा आणि दोन लहान असे एकूण तीन धबधबे आहेत. त्यामुळे सिंधुरत्न योजनेतून मोठ्या आणि लहान धबधब्यांच्या मध्यावर पर्यटनदृष्ट्या अतिशय आकर्षक काचेचा पूल उभारण्यात आला आहे.

Napane Glass Bridge
Bridge For Ghanegar: साकवावरून जीवघेणा प्रवास

सिंधुरत्न योजनेतून ९९ लाख ६३ हजार रुपये खर्चून हा पूल उभारला जात आहे. या पुलाचे सुमारे ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. अतिशय वेगळी संकल्पना राबवीत हे काम करण्यात आले असून, काचा बसवून तयार केलेला धबधब्यावरील हा महाराष्ट्रातील पहिला पूल ठरला आहे. या पुलाच्या बाजूला काचा बसविण्याचे काम सध्या सुरू आहे. पुढील दहा-पंधरा दिवसांत हे काम पूर्ण होऊन हा पूल पर्यटकांसाठी खुला होईल.

अतिशय वेगळ्या संकल्पनेतून या पुलाचे डिझाइन तयार करून घेण्यात आले आहे. कामाच्या दर्जाशी कसलीही तडजोड करण्यात आलेली नाही. त्यामुळे उत्तम असा काचेचा पूल तयार झाला आहे. एका वेळी २५ ते ३० पर्यटक सहजपणे या पुलावरून पर्यटनाचा आनंद घेऊ शकतात.
- विनायक जोशी, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, वैभववाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com