Agriculture Digital Services: जमिनीच्या दाव्यांची माहिती घरबसल्या मिळणार; डिजिटल सेवांचा नवा प्रारंभ

Land Claims: आता नागरिकांना जमिनीच्या दाव्यांची माहिती घरबसल्या मिळवता येईल. डिजिटल प्रणालीच्या माध्यमातून जमीन संबंधित सर्व तपशील आणि दावे एक क्लिकवर उपलब्ध होतील. यामुळे लोकांना वेळ आणि श्रम वाचवता येतील आणि प्रक्रिया अधिक पारदर्शक होणार आहे.
Agricultural Online Services
Agricultural Online ServicesAgrowon
Published on
Updated on

Pune News: जमीन मोजणीसंदर्भातील तालुका उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, प्रदेश उपसंचालक ते महसूलमंत्री यांच्या न्यायालयात दाखल असलेल्या दाव्यांची पुढील तारीख, दाव्यांची सद्यःस्थिती यांच्यासह निकालाची प्रत ऑनलाइन उपलब्ध होणार आहे.

त्यासाठी भूमिअभिलेख विभागाने एनआयसीच्या मदतीने www.eqjcourts.gov.in हे संकेतस्थळ विकसित करण्याचे काम हाती घेतले आहे. या संकेतस्थळावर घरबसल्या दाव्यांची सर्व माहिती मिळणार आहे, अशी माहिती राज्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.

Agricultural Online Services
Land Record Registration : गुंता इतर हक्क नोंदीचा

राज्य सरकारकडून सर्व खात्यांना शंभर दिवसांचा कार्यक्रम निश्‍चित करून देण्यात आला आहे. त्यामध्ये भूमिअभिलेख विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांसाठी ईक्यूजे कोर्ट ही सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेल्या संकेतस्थळाची नुकतीच सहाही विभागांत प्राथमिक स्तरावर चाचपणी करण्यात आली. लवकरच राज्यभरात ही प्रणाली लागू करण्यात येणार आहे.

जमिनींच्या हद्दीवरून निर्माण होणारे वाद, मोजणीतील त्रुटी अशा अनेक प्रकरणांसाठी भूमिअभिलेख विभागातील उपअधीक्षक, जिल्हा अधीक्षक, उपसंचालक आणि महसूलमंत्री यांच्यापर्यंत अपिलामार्फत दाद मागता येते. मात्र, अपील दाखल केल्यानंतर सध्या भूमिअभिलेख विभागात पारंपरिक पद्धतीने त्यावर कारवाई केली जाते.

Agricultural Online Services
Land Record Office : भूमी अभिलेख कार्यालये येणार एकाच छताखाली

त्यासाठी अपीलकर्त्याला तारखांना हजर राहावे लागते. तर निकालानंतर तो ऑनलाइन प्रसिद्ध करण्यात येते. मात्र, आता ईक्यूजे कोर्ट प्रणालीमध्ये ऑनलाइन दावा दाखल करण्याबरोबरच त्या दाव्याची सद्यःस्थिती जाणून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

निकालाची प्रतही संकेतस्थळावर

जमीन मोजणीविषयक दाव्यांच्या माहितीसाठी हे संकेतस्थळ विकसित करण्यात येत आहे. दावा दाखल केल्यानंतर संबंधित कारकून याची नोंद ई डिसनिक या प्रणालीमध्ये करणार आहे. यामध्ये दाव्याचा तपशील, पक्षकारांचा मोबाइल नंबर आदी माहिती भरली जाणार आहे.

त्यानंतर पक्षकारांना पुढील तारीख कधी, याची माहिती देणारा एसएमएस येईल. याशिवाय दाव्याचा निकाल लागल्यानंतर निकालाची प्रतही या संकेतस्थळावर अपलोड करण्यात येणार आहे. त्यामुळे निकालाची प्रतही घरबसल्या बघता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com