Flower Disease : फ्लॉवर पिकातील ‘गड्डा सड रोग’

Flower Cultivation : महाराष्ट्रात फ्लॉवर हे महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. राज्यात सुमारे १६,००० हेक्टरच्या आसपास फ्लॉवर लागवड असते.
Flower Disease
Flower DiseaseAgrowon

Gadda Sad Disease in Flower : महाराष्ट्रात फ्लॉवर हे महत्त्वाचे भाजीपाला पीक म्हणून घेतले जाते. राज्यात सुमारे १६,००० हेक्टरच्या आसपास फ्लॉवर लागवड असते. यात प्रामुख्याने नाशिक, नगर, पुणे या जिल्ह्यांत फ्लॉवर खालील क्षेत्र जास्त आहे. फ्लॉवर पिकामध्ये मुख्यत: दांडा सड, रोप मर, गड्डा सड या महत्त्वाच्या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येतो.

आज आपण फ्लॉवर पिकातील गड्डा सड या रोगाची माहिती घेऊया. हा रोग प्रामुख्याने पानांवर व गड्ड्यावर दिसून येतो. रोगाच्या प्रादुर्भावामुळे गड्डा खराब होऊन पिकाचे मोठे नुकसान होते. या रोगाचा नमुना आम्हाला निफाड (ता. निफाड, जि. नाशिक) येथून मिळाला होता. डोळ्यांना दिसणारे लक्षणे व सूक्ष्मदर्शकाखाली नमुन्याची तपासणी केल्यानंतर हा ‘गड्डा सड’ रोग असल्याचे स्पष्ट झाले.

लक्षणे

प्रथम खालील जुन्या पानांवर रोगाची लक्षणे दिसतात. सुरुवातीला तुरळक तपकिरी ठिपके पानावर पडतात. त्यानंतर ठिपके अर्धा इंचापर्यंत वाढू शकतात.

हे ठिपके अतिशय वेगळ्या प्रकारचे असतात. ठिपके जवळून पाहिले असता एकमेकांभोवती पडलेल्या वर्तुळाप्रमाणे हे दिसतात. याला इंग्लिशमध्ये concentric rings असे म्हणतात.

कालांतराने नवीन पानांवर देखील ठिपके दिसून येण्यास सुरुवात होते. हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते व गळून पडते.

फ्लॉवरच्या गड्ड्यावर काळसर रंगाचे ठिपके दिसू लागतात. कालांतराने हे ठिपके मोठे होत जातात. आणि संपूर्ण गड्डा काळसर दिसू लागतो.

Flower Disease
Bitter Gourd Disease : कारले पिकातील ‘लीफ ब्लाइट’

रोगाची माहिती

रोगाचे कारण : बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

रोग निर्माण करणाऱ्या बुरशीचे शास्त्रीय नाव ः अल्टरनेरिया ब्रासिसिकोला (Alternaria brassicicola) किंवा अल्टरनेरिया ब्रासिकोला (Alternaria brassicola) असे आहे.

नुकसान : या रोगामुळे साधारणतः १० ते ४० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते.

अन्य यजमान पिके : कोबी, चायना कोबी, ब्रोकोली, बृशेल, मोहरी.

अनुकूल हवामान

रोगाचा प्रसार बियाण्यामार्फत होऊ शकतो.

बुरशीचे बीजाणू बियाण्यांवर किंवा आतमध्ये असू शकतात. अशा बियाण्यांतून रोगग्रस्त रोपे तयार होतात.

या रोगाचे बीजाणू जमिनीमध्ये, शेतातील पिकांचे जुने अवशेष यावर जिवंत राहतात. हे बीजाणू जमिनीमध्ये अनेक दशके जिवंत राहू शकतात.

साधारण ८५ ते ९० टक्के आर्द्रता व २५ ते ३० अंश सेल्सिअस तापमानात रोगाची लागण होते. अशा वातावरणात बीजाणू अंकुरीत होतात. पुढील १२ तासांत रोग पानाच्या आत जाऊन रोगाची लागण करतात. त्यानंतर २ ते ४ दिवसांनी रोगाची लक्षणे दिसू लागतात.

२५ अंश सेल्सिअस तापमानात जर वातावरणात आर्द्रता, थंडी, पाऊस अशी हवामान स्थिती असल्यास पुन्हा रोगाचे नवीन काळ्या रंगाचे बीजाणू तयार होतात. हे बीजाणू पाऊस, हवा किंवा किडींमार्फत (Flea Beetle) शेतात पसरतात.

नियंत्रणाचे उपाय

लागवडीसाठी प्रमाणित बियाणे वापरावे.

बियाण्यांना बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी.

पीक फेरपालट करावे. फ्लॉवर लागवडीनंतर किंवा त्याआधी दुसरे कोबीवर्गीय पीक घेऊ नये.

पिकास पाण्याचा ताण देऊ नये.

संतुलित अन्नद्रव्यांचा पुरवठा करावा. अन्नद्रव्याची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी.

पिकावर येणाऱ्या विविध किडींचा बंदोबस्त करावा. विशेषतः flea Beetles.

रोगाचा प्रादुर्भाव पाने व गड्ड्यांवर दिसून येत असल्यास ती त्वरित तोडून नष्ट करावीत.

शिफारस केलेल्या बुरशीनाशकांचा वापर करावा.

जमिनीवर व झाडावर ट्रायकोडर्मा व्हिरीडी या जैविक बुरशीनाशकाची फवारणी करावी.

शिफारशीत बुरशीनाशकांचा तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच वापर करावा.

Flower Disease
Tomato Disease : टॉमॅटो पिकातील ‘लवकर येणारा करपा’

शिफारशीत बुरशीनाशके (लेबलक्लेम युक्त)

अ) फ्लॉवर

क्लोरोथॅलोनील (७५ टक्के डब्ल्यूपी)

मॅन्कोझेब (७५ टक्के डब्ल्यूजी)

ॲझॉक्सिस्ट्रॉबीन (४.८ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू) अधिक क्लोरोथॅलोनील (४० टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी) (संयुक्त बुरशीनाशक)

ब) कोबी

टेब्यूकोनॅझोल (३८.३९ टक्के डब्ल्यू/डब्ल्यू एससी)

सूक्ष्मदर्शकाखाली काय दिसते?

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे वेगवेगळे भाग अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. यामध्ये रोगाचे तंतू (Filament) लांब धाग्याप्रमाणे दिसून येतात. या तंतूंवर काळसर रंगाचा छोटासा बीजाणू कोषदंड (Conidiophore) असतो. या कोषदंडावर लंब गोलाकार व कप्पे कप्पे असले बीजाणू (Conidia) असतात. हे या बुरशीचे अलैंगिक बीजाणू असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

सूक्ष्मदर्शकाखाली आपण रोगाचे वेगवेगळे भाग अतिशय स्पष्टपणे पाहून रोग निश्‍चिती करू शकतो. यामध्ये रोगाचे तंतू (Filament) लांब धाग्याप्रमाणे दिसून येतात. या तंतूंवर काळसर रंगाचा छोटासा बीजाणू कोषदंड (Conidiophore) असतो. या कोषदंडावर लंब गोलाकार व कप्पे कप्पे असले बीजाणू (Conidia) असतात. हे या बुरशीचे अलैंगिक बीजाणू असतात. हे बीजाणू पुढील रोग निर्मितीस कारणीभूत असतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com