Bitter Gourd Disease : कारले पिकातील ‘लीफ ब्लाइट’

Leaf Blight : कारले पिकातील भुरी व डाउनी मिल्ड्यू हे रोग शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. भुरी रोगात पानांवर पावडर पसरल्यासारखे दिसते. त्यामुळे हा रोग लवकर ओळखू येतो.
Leaf Blight
Leaf BlightAgrowon

Leaf Blight of Bitter Gourd : कारले पिकातील भुरी व डाउनी मिल्ड्यू हे रोग शेतकऱ्यांच्या परिचयाचे आहेत. भुरी रोगात पानांवर पावडर पसरल्यासारखे दिसते. त्यामुळे हा रोग लवकर ओळखू येतो. या पिकात अन्य रोगही आहेत. पण त्यातीव काहींनी शेतकरी डाऊनी समजतात. त्या अनुषंगाने बुरशीनाशकांचा वापर करतात.

त्यातून रोगाचे नियंत्रण होत नाहीच. शिवाय खर्च मात्र भरपूर होतो. तर कारले पिकातील एका महत्त्वाच्या रोगाविषयी आपण येथे माहिती घेणार आहोत. तो रोग म्हणजे ‘लीफ ब्लाइट’. त्याचा नमुना आम्हाला पिंपळगाव (ता. मालेगाव, जि. नाशिक) येथे मिळाला होता. सूक्ष्मदर्शकाखाली त्याची ओळख अधिक स्पष्ट झाली.

Leaf Blight
Bitter Gourd Farming : कारले लागवडीत राखले सातत्य

लीफ ब्लाइट रोगाची माहिती

हा रोग बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो.

बुरशीचे शास्त्रीय नाव- अल्टरनारीया कुकुमेरीना (Alternaria cucumerina).

आढळ - कारले पिकवणाऱ्या सर्व राज्यांमध्ये आढळ आहे. (महाराष्ट्र, राजस्थान, बंगाल, उत्तर प्रदेश, आसाम, पंजाब)

नुकसान - ५० ते १०० टक्क्यांपर्यंत करण्याची क्षमता.

अन्य यजमान पिके - काकडी, गिलके, टरबूज आदी काकडीवर्गीय पिके.

अनुकूल हवामान - बुरशीचे बीजाणू गवत, शेतातील काडी कचरा किव्हा काकडीवर्गीय पिकांवर जिवंत राहतात. दमट तापमान ते धुके असलेल्या वातावरणात २ ते ८ तासांत रोगाचा प्रादुर्भाव होतो. पान ओले राहिल्यास प्रादुर्भाव जास्त लवकर होतो. पाऊस किती झाला, यापेक्षा धुके व पाने किती वेळ ओली होती यावर रोगाच्या प्रादुर्भावाची तीव्रता अवलंबून असते.

Leaf Blight
Bitter Gourd Cultivation : कारले लागवड ठरली आर्थिकदृष्ट्या फायदेशीर

रोगाची लक्षणे

वरील पानांवर गोलाकार किंवा वाकड्या आकाराचे तपकिरी ते भुरकट रंगाचे ठिपके दिसतात.

ठिपक्यांचा मधला भाग बऱ्याच वेळा पांढरट असतो. ठिपके जरा खोल गेलेले जाणवतात.

ते मोठे झाल्यानंतर त्यामध्ये एकात एक अशी वर्तुळे दिसतात.

रोग ओळखण्याचा सर्वांत सोपा मार्ग म्हणजे हे ठिपके वाढत जाऊन पूर्ण पान वाळून जाते. गळून पडते. परिणामी, फळांच्या पोषणावर परिणाम होतो. फळावर ‘सन बर्निंग’ होते.

नियंत्रण उपाय

शेतामध्ये हवा खेळती असावी. त्यामुळे रोगाचे ‘इनोकुलम’ जास्त प्रमाणात शेतात राहणार नाही.

तसेच पानेही ओली राहणार नाहीत.

पिकाची फेरपालट करावी. कारले पिकानंतर किंवा त्याआधी काकडीवर्गीय पीक घेऊ नये. (उदा. गिलके, काकडी, टरबूज, खरबूज, भोपळा)

पाणी देण्यासाठी शक्यतो ‘स्प्रिंकलर’चा वापर टाळावा. त्यामुळे पाने जास्त काळ ओली राहून रोगास अनुकूल वातावरण निर्माण होते.

शिफारस केलेल्या खालीलपैकी बुरशीनाशकांचा सल्ल्याने वापर करावा.

कार्बेनडाझिम अधिक मॅन्कोझेब (५० टक्के डब्ल्यूएस).

डायफेनोकोनॅझोल (२५ टक्के)

प्रॉपीकोनॅझोल (२५ टक्के ईसी).

मॅन्कोझेब

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com