
Pune News: राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने अकरावी प्रवेशासाठी ऑनलाइन नोंदणीची सुधारित तारीख जाहीर केली आहे. मात्र संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना व पालकांना नोंदणीत त्रास सहन करावा लागत आहे. या गोंधळामुळे प्रवेश प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबवली आहे. याकरिता १९ आणि २० मे ला सराव सत्रे घेण्यात आली होती. तसेच या सरावानंतर २१ मे रोजी प्रत्यक्ष अर्ज नोंदणी सुरू करण्यात आली होती.
परंतू तांत्रिक अडचणींमुळे अधिकृत वेबसाइट चालण्यास अडचणी येत होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोंदणी करता आली नाही. याकरिता २१ मे रोजी सुरु झालेल्या नोंदणीत शिक्षण विभागाला सुधारित परिपत्रकानुसार बदल करुन नव्या तारखेनुसार जाहीर करावे लागले आहे.
तर आता नवीन ऑनलाइन नोंदणी २६ मे ला सुरु झाली असून ३ जून ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असणार आहे. तसेच ५ जूनला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. तर ६ आणि ७ जून रोजी गुणवत्तायादीवर आक्षेप व हरकती नोंदवण्याची संधी असून आणि ८ जूनला अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध केली जाईल. तर पहिली वाटप यादी १० जूनला असेल अशी माहिती राज्यातील शिक्षण विभागाकडून देण्यात आली आहे.
याप्रकारामुळे २१ ते २५ सुरुवातीचे काही दिवस संकेतस्थळ बंद राहि्ल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. तसेच या सर्व प्रकारात चार ते पाच दिवस गेल्यानंतरही वेबसाईटची गुणवत्ता सुधारलेली नाही. अर्ज नोंदणीच्या वेळी संकेतस्थळ अडचणीत येणे,
पसंतीक्रम शोधण्यात जास्त वेळ लागणे आणि शुल्क भरण्यात अडचणी यामुळे अर्ज पुढे सरकत नसल्याचा अनुभव विद्यार्थी आणि पालकांना येत आहे. अशा वेगवेगळ्या तक्रारींमुळे पालक व विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शासनाच्या या ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया निर्णयावर आता शंका निर्माण झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.