Crop Competition : फळे, भाजीपाला, मसाला पिके स्पर्धा २ जानेवारीला!

January Farming Event : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान फळे, भाजीपाला, मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला होणार आहे.
Fruit, Vegetable and Spice Crop Competition
Fruit, Vegetable and Spice Crop CompetitionAgrowon
Published on
Updated on

Nanded News : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे माळेगाव यात्रेदरम्यान फळे, भाजीपाला, मसाला पिके स्पर्धा आता २ जानेवारीला होणार आहे. कृषी प्रदर्शनही दोन ते चार तारखेदरम्यान होणार असल्याची माहिती कृषी विभागाने केली आहे.

माळेगाव येथे सटवाई मंदिराजवळ हे प्रदर्शन दोन ते चार जानेवारी या कालावधीत होणार आहे. माळेगाव यात्रेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांनी हा बदल लक्षात घ्यावा व प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या पुरस्कार प्राप्त शेतकरी, स्टॉल धारक तसेच शेतातील फळे भाजीपाला व पिके स्पर्धेसाठी आणणाऱ्या स्पर्धकांनी हा बदल तातडीने लक्षात घ्यावा,असे आवाहन करण्यात आले आहे.

Fruit, Vegetable and Spice Crop Competition
Crop Competition : खरीप हंगाम पीक स्पर्धेसाठी ३१ डिसेंबर अंतिम मुदत

या प्रदर्शनातील सर्वात महत्त्वाची फळे भाजीपाला व मसाला पिके स्पर्धा २ जानेवारीला होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपले फळे, भाजीपाला व मसाला पिकांचे नमुने २ जानेवारी गुरुवारी सकाळी बारा वाजेपर्यंत डॉ. शंकरराव चव्हाण कृषी प्रदर्शनात कृषी विभागाच्या स्टॉलमध्ये आणून ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Fruit, Vegetable and Spice Crop Competition
Crop Competition : शेतकऱ्यांनी रब्बी हंगाम पीक स्पर्धेत सहभागी व्हावे

या कृषी प्रदर्शनात प्रस्तावित करण्यात आलेला कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार कार्यक्रम देखील दोन जानेवारीला च होणार आहे. कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार सकाळी अकरा वाजता होईल. तसेच प्रदर्शनात सहभागी होणाऱ्या सर्व स्टॉल धारकांनी आपले बियाणे, खते, औषधी, ट्रॅक्टर, शेती उपयोगी अवजारे व इतर सर्व स्टॉल दिनांक २ जानेवारी रोजी सकाळी कृषी प्रदर्शनात उभे करण्याचे आवाहन कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे.

कृषी प्रदर्शन २ ते ४ जानेवारी दरम्यान

फळे भाजीपाला व मसाले पिके स्पर्धा तसेच कृषिनिष्ठ पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सत्कार हा दोन जानेवारी रोजी होत आहे. तथापि हे कृषी प्रदर्शन दोन ते चार जानेवारी असे तीन दिवस सुरू असणार आहे तेव्हा नांदेड महानगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी माळेगाव यात्रेदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाला भेटी द्याव्यात असे आवाहनही कृषी विकास अधिकारी सचिन कपाळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com