Kisan Agricultural Exhibition : किसान कृषी प्रदर्शनात ‘स्वयं टॉक्स’तर्फे ‘शेत हसल’चे आयोजन

Agriculture-related Programs : स्वयं टॉक्स आणि ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेत हसल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
Kisan Agricultural Exhibition
Kisan Agricultural ExhibitionAgrowon
Published on
Updated on

Pune News : स्वयं टॉक्स आणि ‘ॲग्रोवन’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शेत हसल’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील ‘किसान’ कृषी प्रदर्शनात १२ ते १४ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत कृषिविषयक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या वेळी शेती व्यवसायातील आयडॉल्स, रोल मॉडेल्सना भेटण्याची संधी शेतकऱ्यांना मिळणार आहे.

Kisan Agricultural Exhibition
Agrowon Exhibition 2024 : तुडये गावचे सतीश पाटील ठरले ड्रोनचे मानकरी

या कार्यक्रमात शेती विकासासाठी शासकीय व खासगी संस्थांच्या योजना, शेती विकासासाठी सोशल मीडियाचा वापर, शेती विकासातील संधी, सेंद्रिय शेती, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ग्लोबल झेप, पानी फाउंडेशनचे कार्य अशा अनेक विषयांवर नामवंत तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

Kisan Agricultural Exhibition
Agro Vision Krishi Exhibition : विकसनशील भाग म्हणून विदर्भ कृषी क्षेत्रात नावारूपास येणार

शेतीला एका उत्तम व्यवसायाचे स्वरूप देत प्रगती कशी साधायची, जागतिक स्तरावरील संधी याबद्दल सविस्तर माहिती येथे मिळणार आहे. तसेच शेतकऱ्यांना आपल्या मनातील शंका, प्रश्‍न विचारण्याची, नामवंत तज्ज्ञांशी संवाद साधण्याची संधी या वेळी मिळणार आहे.

शेतकरी, कृषी अभ्यासक आणि कृषी प्रेमींसाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरेल. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पुढील लिंकवर नाव नोंदणी करावी. http://shethustle.kisan.in/

QR
QRAgrowon

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com