Fruit Orchard Cultivation: राज्यात ‘रोहयो’तून ४७ हजार हेक्टरवर फळबाग लागवड

ROHYO Scheme: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार (रोहयो) योजनेअंतर्गत राज्यात २०२४-२५ मध्ये ४६,९१८ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. कोकण आणि नाशिक विभाग या योजनेत आघाडीवर असून सात जिल्ह्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले आहे.
Fruit Crop Cultivation
Fruit Crop CultivationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार’ (रोहियो) योजनेतून फळबाग लागवडीसाठी गेल्या वर्षभरात (२०२४-२५) साठ हजार हेक्टर क्षेत्र निश्चित केले होते. त्यापैकी मार्चअखेर ४६,९१८ हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. उद्दिष्टांच्या ७८.२० टक्के क्षेत्रावर लागवड झाली आहे. वर्षभराच्या फळबाग लागवडीत सात जिल्ह्यांनी उद्दिष्ट पूर्ण केले. तर कोकण, नाशिक विभाग लागवडीत आघाडीवर आहेत.

शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबत फळबाग लागवड करावी यासाठी शासनाकडून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून अनुदान देऊन प्रोत्साहित केले जाते. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे. बहुतांश शेतकरी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून लागवड करतात.

Fruit Crop Cultivation
Fruit Orchard Cultivation: कृषी विद्यापीठात १०० हेक्टरवर फळबाग लागवडीस प्रारंभ

राज्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून दर वर्षी प्रत्येकी ६० हजार हेक्टर क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले जात आहे. लागवडीला मोठा प्रतिसाद मिळत प्रत्येक वर्षी चाळीस हजार हेक्टरपेक्षा अधिक म्हणजे उद्दिष्टाच्या ८० ते ९० टक्क्यांपर्यंत फळबाग लागवड झाली. राज्यातील बहुतांश भागात पुरेसा पाऊस नसल्याने २०२३-२४ मध्ये ३८ हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली होती. गेल्या वर्षभरासाठी (२०२४-२५) राज्यात ६० हजार हेक्टरवर लागवडीचे उद्दिष्ट निश्‍चित केले होते.

साधारण जूनच्या मध्यापर्यंत खड्डे खोदून जूनला पावसाळा सुरू झाला, की फळबाग लागवडीला सुरुवात होते. ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत बऱ्यापैकी लागवड उरकली जावी अशा पद्धतीने कृषी विभागाकडून नियोजन केले होते. त्यामुळे २०२३-२४ च्या तुलनेत यंदा २०२४-२५ मध्ये फळबाग लागवडीचे क्षेत्र वाढल्याचे दिसून येत आहे. यंदा वर्षभरात मार्चअखेरपर्यंत ४६,९१८ हेक्टरवर म्हणजे निश्चित उद्दिष्टांच्या ७८.२० टक्के लागवड झालेली आहे.

Fruit Crop Cultivation
Fruit Orchard Planning: नवीन फळबाग लागवडीचे नियोजन

कृषी विभागाने राज्यभरातील कृषी सहाय्यकांच्या मदतीने उद्दिष्ट देऊन फळबाग लागवड केल्याने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेतून लागवड क्षेत्रात वाढ होण्याला मदत झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात यंदा मार्चअखेर झालेल्या फळबाग लागवडीत पालघर जिल्ह्यात उद्दिष्टाच्या सर्वाधिक १४६.९६ टक्के (३ हजार ८२१ हेक्टर) लागवड झाली असून धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलडाणा, सोलापूर, गडचिरोली अशा सात जिल्ह्यांत उद्दिष्टांपेक्षा अधिक लागवड झाली आहे.

ठाणे विभागात ९ हजार १३५ हेक्टर (७८ टक्के), नाशिक विभागात ८ हजार ५९५ हेक्टर (९७.६७ टक्के), पुणे विभागात ६ हजार ५४० हेक्टर (८४.९३ टक्के), कोल्हापुर विभागात २ हजार २० हेक्टर (६७.३६ टक्के), छत्रपती संभाजीनगर विभागात ३ हजार ८५ हेक्टर (७१.७५ टक्के) लातुर विभागात ३ हजार ४४ हेक्टर (५४.३७ हेक्टर), अमरावती विभागात ९ हजार ७ हेक्टर (९५.७९ टक्के) व नागपूर विभागात ५ हजार ४९२ (६५.३८ टक्के) लागवड झाली आहे.

जिल्हानिहाय फळबाग लागवड (हेक्टरमध्ये)

ठाणे : ११५४.५२, पालघर : ३८२१, रायगड : १५८७.६७, रत्नागिरी : १३६०.४९, सिंधुदुर्ग : १२०९.७३, नाशिक : २५६८.१७, धुळे : १२६५.२०, नंदुरबार : २९३५, जळगाव : १८२६.४५, अहिल्यानगर : २१८७.५८, पुणे : १४६४.५५, सोलापूर : २८८७.३०, सातारा : १०७५.२०, सांगली : ८०८.६१, कोल्हापुर : १३६.८४, छत्रपती संभाजीनगर : ४९०, जालना : १७८०.३०, बीड : ८१४.८२, लातूर : ६२१, धाराशिव : ९२२.६४, नांदेड : ५०५.४४, परभणी : ५२३.८३, हिंगोली : ४७१.७०, बुलडाणा : २७५५.७४, अकोला : १०२५.६४, वाशीम : ८१६.५०, अमरावती : २०२६.२५, यवतमाळ : २३८३.६३, वर्धा : ४५३.३०, नागपूर : ९६५.२६, भंडारा : ३९७, गोंदिया : १४२२.४८, चंद्रपूर : ११८७.२८, गडचिरोली : १०६६.६७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com