Fruit Orchard Cultivation: कृषी विद्यापीठात १०० हेक्टरवर फळबाग लागवडीस प्रारंभ

VNM Agriculture University: उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्र प्रकल्पाअंतर्गत १०० हेक्टरवर फळबाग लागवडीचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनी रविवारी (ता.२६) कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते आंबा रोपटे लावून करण्यात आला.
Fruit Research Center Project
Fruit Research Center ProjectAgrowon
Published on
Updated on

Parbhani News: वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील मध्यवर्ती प्रक्षेत्रावरील अनेक वर्षांपासून पडीक जमीन विहितीखाली आणून तेथे उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्र प्रकल्पाअंतर्गत १०० हेक्टरवर फळबाग लागवडीचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनी रविवारी (ता.२६) कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्या हस्ते आंबा रोपटे लावून करण्यात आला.

Fruit Research Center Project
Fruit Orchard Protection : थंडीमध्ये फळबागा जपा

कृषी विद्यापीठाच्या या महत्वकांक्षी प्रकल्पांतर्गत आंबा फळपिकाचे भारतीय व विदेशी ६० वाण, ॲव्हाकॅडो, ड्रॅगन फ्रूट, बेल, आवळा, जांभूळ या फळझाडांच्या विविध जातींची लागवड करण्यात येणार आहे. फळबाग लागवडीसाठी लखनौ, बंगळूर, अयोध्या, संगांरेडी, दापोली, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणांहून ४० हजारांहून अधिक कलमे तसेच रोपटी आणली आहेत. निर्यातक्षम फळांचे उत्पादन घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे.

Fruit Research Center Project
VNMKV Convocation ceremony : 'वनामकृवि’चा २६ वा दीक्षान्त समारंभ गुरुवारी

यावेळी संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, शिक्षण संचालक डॉ.भगवान आसेवार, विस्तार शिक्षण संचालक डॉ. गिरिधारी वाघमारे, उद्यान विद्या विभाग प्रमुख डॉ. विश्वनाथ खंदारे, तांत्रिक अधिकारी डॉ. प्रवीण कापसे, डॉ. संतोष बरकुले, डॉ. राहुल बगिले, डॉ. वैशाली भगत, डॉ.अंशुल लोहकरे आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. इंद्र मणी यांनी प्रकल्पातील कर्मचाऱ्याचा सत्कार केला आणि समर्पण भावनेने कार्य करण्याचे आवाहन केले.

आंब्याच्या देशी-विदेशी वाणांवर संशोधन, संवर्धन

उच्च तंत्रज्ञान आंबा व विदेशी फळ संशोधन केंद्र हे आंबा व कोरडवाहू फळांच्या संशोधनासाठी तसेच केशर आंबा रोपवाटिका, आंब्यांच्या देशी (गावरान) वाणांचे संवर्धन आणि इतर फळ संशोधनासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. विद्यापीठातील पदव्युत्तर पदी (एम.एस्सी.), आचार्य पदवी (पीएच.डी) अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी या फळबागेत अभ्यास व संशोधन प्रकल्प दिले जातील. शास्त्रज्ञ आणि विद्यार्थ्यांच्या प्रयोगांद्वारे शेतकऱ्यांसाठी शाश्वत उत्पादन देणाऱ्या शिफारशी केल्या जातील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com