
Ahilyanagar News : स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून गेल्या वर्षभरात (२०२४-२५) अहिल्यानगर जिल्ह्यात ११२७.६७ हेक्टरवर फळबाग लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याला ८७ लाख ४२ हजारांचे अनुदान दिले असल्याची माहिती अहिल्यानगर येथील कृषी विभागातून देण्यात आली.
पारंपरिक पिकांसोबतच अलीकडच्या काही वर्षांपासून शेतकरी फळबाग लागवडीला प्राधान्य देत आहेत. शासनाकडूनही फळबाग लागवडीला अनुदान देऊन प्रोत्साहित केले जात आहे. अल्प व अत्यल्पभूधारक (पाच एकरांच्या आतील) शेतकऱ्यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून (एमआरईजीएस) व पाच एकरांवरील शेतकऱ्यांसाठी स्व. भाऊसाहेब फुंडकर योजना राबवली जात आहे. स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेतून फळबाग लागवड करण्याकडेही शेतकऱ्याचा कल असल्याची दिसून येत आहे.
अहिल्यानगर येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातून दिलेल्या माहितीनुसार, फळबाग लागवड योजनेतून गेल्या वर्षभरात अहिल्यानगर जिल्ह्यात १८५६ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानापोटी ८७ लाख ४२ हजारांचे अनुदान दिले आहे. या योजनेतून सर्वाधिक श्रोगोंदा तालुक्यात २५७ हेक्टरवर लागवड झाली असून, कोपरगाव, शेवगावला सर्वात कमी म्हणजे केवळ ७ हेक्टरवर लागवड झाली आहे.
अहिल्यानगर तालुक्यात १३४.८४ हेक्टर, पारनेरला ४२.८२, पाथर्डीला १४२.६६, कर्जतला ः १०८.५३, जामखेडला ३८.५६, राहुरीला १०६, नेवाशाला ६२.३३, श्रीरामपूरला २५.३६, नेवाशाला ६४.९६, अकोल्यात १७.१३, संगमनेरला ४४.८६ कोपरगावला ७.१, राहाता तालुक्यात १३२.२३ हेक्टरवर फळबाग लागवड झाली असल्याची माहिती देण्यात आली.
तालुकानिहाय दिलेले अनुदान (कंसात शेतकरी)
नगर ः १,०३,६१,७४६,(२२५)
पारनेर ः ३२,०९,६७३,(७४)
पाथर्डी ः १,०९,२६,८७० (२४७)
कर्जत ः ७९,७०,४६९,(१७२)
जामखेड ः३०,८०,८६६ (५७)
श्रीगोंदा ः १,८४,४५,१२० (४७७)
राहुरी ः ८०,८४,७३७ (१६६)
श्रीरामपूर ः २२,५४,६३०(३९)
नेवासा ः ५२,२१,८५८ (९१)
शेवगाव ः ५,०४,२९४ (११)
संगमनेर ः ३४,८२,५५० (७५)
कोपरगाव ः ५,३८,९१९ (७)
अकोले ः १५,६८,५३७(२७)
राहाता ः १,१३,९२,०२८ (१८८)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.