
Amaravati News : विविध योजनांतील घरकुलांसाठी मोफत वाळू उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या धोरणांतर्गत जिल्ह्यातील १३ टक्के लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध झाली आहे. एकूण मागणीच्या तुलनेत केवळ चार टक्के, तर उपलब्ध वाळूसाठ्याच्या तुलनेत हा पुरवठा १६ टक्के आहे. काही तालुक्यांतील लाभार्थ्यांना केवळ एक ब्रास वाळू मिळाली.
अमरावती जिल्ह्यात ५४ हजार ९४९ घरकुल लाभार्थी असून त्यांना बांधणीसाठी दोन लाख १५ हजार १४ ब्रास वाळूची गरज आहे. पाच ब्रास वाळू मोफत देण्याच्या धोरणांतर्गत पालकमंत्र्यांच्या पुढाकाराने नुकतेच वाळू उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अद्यापपर्यंत ७१४८ लाभार्थ्यांना याचा लाभ देण्यात आला असून ८८७० ब्रास वाळूचा पुरवठा करण्यात आला आहे. अमरावती तालुका वगळता उर्वरित तालुक्यांत केवळ एक ते दोन ब्रास वाळू उपलब्ध झाली आहे.
जिल्ह्यात १६५ वाळूघाट असून त्यामध्ये ५४ हजार ९१८ ब्रास वाळू उपलब्ध आहे. यातील केवळ आठ हजार ८७० ब्रास वाळू घरकुल लाभार्थ्यांना पुरवण्यात आली. याचाच अर्थ उपलब्धतेच्या तुलनेत हा पुरवठा केवळ १६ टक्के तर एकूण मागणीच्या तुलनेत चार टक्के इतकाच आहे. लाभार्थी संख्या बघता १३ टक्के लाभार्थ्यांना लाभ मिळू शकला आहे.
तालुकानिहाय वाळूवाटप
तालुका लाभार्थी
संख्या वाटप
झालेली वाळू (ब्रासमध्ये)
अमरावती १५ ७५
तिवसा ३१ १२१
भातकुली २७९ २८७
चांदूररेल्वे २४५ ३०७
नांदगाव खं. ३९९ ४३०
धामणगाव २०३ २३६
मोर्शी ४३४ ४३४
वरुड ४७९ ४९०
दर्यापूर २६५ ६२८
अंजनगाव ३५० ३५०
अचलपूर २,७३१ २,९९१
चांदूरबाजार २१७ १,०२१
धारणी १,५०० १,५००
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.