
Pune News: शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना, मनरेगाच्या मजुरीत वाढ, शेतमजुरांना विमा संरक्षण, शेतीकामांचा मनरेगामध्ये समावेश करणे, अशा विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी मागील ३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आज अमरावती जिल्ह्यातील विश्रोळी जलाशयात जलसमाधी आंदोलन केले.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्या घोषणापत्रात संपूर्ण कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा करण्याची हमीही दिली होती. मात्र निवडणुका झाल्यानंतर सरकार स्थापन होऊन अनेक महीने झाले, तरी या आश्वासनाची अंमलबजावणी झालेली नाही.
या परिस्थितीत, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या मागण्या घेऊन, पक्षाचे प्रमुख बच्चू कडू यांनी अमरावतीतील गुरुकुंज मोझरी येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महासमाधीस्थळी गेल्या तीन दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
बच्चू कडूंच्या अन्नत्याग आंदोलनाला अधिक बळकट आणि दिशा देण्यासाठी, पंधरा ते वीस प्रहार कार्यकर्ते पूर्णा धरणाच्या जलाशयात उतरले आहेत. पाण्यातूनच ते सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला निषेध व्यक्त करत आहेत.
बच्चू कडूंच्या प्रमुख मागण्या:
-शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी-शेतमजुरांच्या विकासासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना
-महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या मजुरीत वाढ
-शेतकऱ्यांप्रमाणेच शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्यास त्यांना विमा संरक्षण मिळावे.
-शेतमजुरांचे आर्थिक हित जपण्यासाठी स्वतंत्र मंडळाची उभारणी.
-लागवड ते कापणीपर्यंतची सर्व शेतीकामे मनरेगामध्ये समाविष्ट करावीत, किंवा तेलंगणाच्या धर्तीवर प्रति एकर १० हजार रुपये मदत द्यावी.
-रासायनिक खतांप्रमाणेच सेंद्रिय व मेंढी खतालाही अनुदान मिळावे.
-दुधातील भेसळ थांबवून गाईच्या दुधाला ५० रुपये आणि म्हशीच्या दुधाला ६० रुपये प्रतिलिटर दर निश्चित करावा.
-कांद्याचे दर ४० रुपये प्रतिकिलो होईपर्यंत कांदा निर्यात बंदी लागू करू नये.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.