Bacchu Kadu : बच्चू कडूंची घेतली शरद पवारांची भेट; दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा

Bacchu Kadu Meets Sharad Pawar : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर महायुतीच्या वेगळी भूमिका घेतली आहे. आता कडू यांनी जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांची भेट घेतल्याने आता नव्या चर्चांना उत आले आहे.
Bacchu Kadu Meets Sharad Pawar
Bacchu Kadu Meets Sharad PawarAgrowon
Published on
Updated on

Pune News : प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी जेष्ठ नेते खासदार शरद पवार यांची शनिवारी (ता.१०) सकाळी घेतली. यामुळे कडू महाविकास आघाडीच्या वाटेवर असल्याची चर्चांना उत आला आहे. तर कडू यांनी आपण फक्त दिव्यांगांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवरून पवार यांची भेट घेतल्याचे म्हटले आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.

कडू यांनी काहीच दिवसांपूर्वी आपली युती फक्त दिव्यांग, कष्टकरी आणि शेतकऱ्यांशी असल्याचे बोलले होते. तर जो पक्ष दिव्यांग, कष्टकरी आणि शेतकऱ्यांच्या मागण्या त्यांचे प्रश्न सोडवेल त्याला आपला पाठिंबा असल्याचे म्हटले होते. यानंतर कडू यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये शुक्रवारी (ता. ९) आक्रोश मोर्चा काढत महायुतीला घराचा आहेर दिला होता.

यादरम्यान आता कडू यांनी पुण्यात पवारांची मोदीबाग येथे भेट घेतली. यावेळी, शेतमजूर, दिव्यांगांसाठी आपण काहीही करू शकतो, असे स्पष्टीकरण कडू यांनी दिले. तसेच शेतमजूर, दिव्यांगांसाठी आपली लढाई असून राज्यातील काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणे गरजेचे आहे. तर शेतकरी, मजूर, कामगार, दिव्यांग हे मुद्दे महत्वाचे असून यांची चर्चा झाली पाहिजे असेही कडू यांनी म्हटले आहे.

याआधी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर जाण्याचे कारण म्हणजे फक्त दिव्यांगांचे प्रश्न होते. त्यासाठी प्रयत्न केला आणि दिव्यांग मंत्रालय मिळालं. आता दिव्यांग मंत्रालयाला बजेट आणि चांगल्या योजना निर्माण झाल्या पाहिजे, असा आपला प्रयत्न असल्याचेही कडू म्हणाले. तर उद्धव ठाकरेंची भेट घेण्याच्या प्रश्नावरूनही कडू यांनी आपली प्रतिक्रिया दिली. कडू म्हणाले, पीडित लोकांचे प्रतिनिधी म्हणून कोणाहीची भेट घेण्यास काहीच हरकत नाही. कष्टकऱ्यांसाठी योजना असली पाहिजे की, नाही?

यावरून सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देताना चांगल्या लोकांनी एकत्र यायला हवं असे म्हटले आहे. तर राज्यात कोणाचीही सत्ता असो पण प्रशासन उत्तमच असायला हवं. यासाठी ज्यांना खरंच महाराष्ट्राचे हित महत्वाचं वाटतं, त्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असं होणं राज्यासह देशासाठी चांगले असल्याचं सुळे यांनी म्हटलं आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com