Bad Condition of Kadegaon Canal
Bad Condition of Kadegaon CanalAgrowon

Kadegaon Canal : कडेगाव कालवा दुरवस्थेमुळे चारशे हेक्टर शेती धोक्यात

Kadegaon Canal Condition : कडेगाव येथील लघुपाटबंधारे तलावाअंतर्गत येणाऱ्या कडेगाव कालव्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे पाटंबधारे विभागाने दुलर्क्ष केले आहे.
Published on

Sangli News : कडेगाव येथील लघुपाटबंधारे तलावाअंतर्गत येणाऱ्या कडेगाव कालव्याची दुरवस्था झाली आहे. मात्र, याकडे पाटंबधारे विभागाने दुलर्क्ष केले आहे. त्यामुळे या कालव्याची तत्काळ स्वच्छता व डागडुजी करावी, अशी मागणी येथील शेतकरी वर्गातून होत आहे.

येथील लघुपाटबंधारे तलावातून कालव्याच्या माध्यमातून कडेगाव व कडेपूर येथील शेतकऱ्यांच्या रब्बी व उन्हाळी पाणी पिकांना दिले जाते. कडेगाव व कडेपूर येथील ४१३ हेक्टर एवढे या कालव्याचे लाभक्षेत्र आहे. येथील शेतकऱ्यांना पाणी देण्याचे सर्व नियोजन टेंभू योजनेच्या कडेपूर कार्यालयाकडून केले जाते.

Bad Condition of Kadegaon Canal
Sugarcane Harvesting Season : राज्यातील उसाचा गळीत हंगाम अंतिम टप्प्याकडे, ७३ कारखान्यांचे धुराडे बंद

कडेगाव हद्दीमध्ये हा कालवा म्हणजे जणू ‘डंपिंग ग्राऊंड’ झाला आहे. येथे सर्वत्र कचरा पाहायला मिळत आहे. या कालव्याला अस्तरीकरण केले गेले नसल्याने अनेक ठिकाणी गळती लागलेली आहे. काही ठिकाणी दारे निकामी झाली आहेत. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जात आहे. त्यामुळे या कालव्याअंतर्गत असलेले संपूर्ण लाभक्षेत्र ओलिताखाली येत नाही.

Bad Condition of Kadegaon Canal
Farmers of Valwa : धुळीमुळे १०० एकरातील पिकांचे नुकसान, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

केवळ अंशतः लाभक्षेत्र पाण्याखाली येत आहे. उर्वरित लाभक्षेत्र आजही तहानलेलेच आहे. उन्हाळी हंगामासाठी कालव्यामधून पाणी सोडावे, अशी मागणी कडेगाव व कडेपूर येथील शेतकरी वर्गातून होत आहे. परंतु सध्या कालव्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. तेव्हा टेंभू योजनेच्या माध्यमातून कालव्याची स्वच्छता व डागडुजी करावी, उन्हाळी हंगामासाठी तत्काळ पाणी सोडावे, अशी मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

बंदिस्त कालव्याचा प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत

कडेगाव हद्दीमध्ये कालवा बंदिस्त करण्यासाठी जलसंपदा विभाग व कडेगाव नगरपंचायत यांच्या संयुक्त माध्यमातून प्रस्ताव मंजुरीसाठी शासन दरबारी पाठवण्यात आला आहे. परंतु तो अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com