Farmers of Valwa : धुळीमुळे १०० एकरातील पिकांचे नुकसान, वाळवा तालुक्यातील शेतकऱ्यांचा इशारा

Sugarcane Crop : ऊसपिकावरही त्याचा थर बसून त्याची वाढ खुंटली आहे. आसपास परिसरात लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांना श्वसनाचे विकार होत आहेत.
Farmers of Valwa
Farmers of Valwaagrowon

Sangli Valwa Farmers : केदारवाडी (ता. वाळवा) येथील येवलेवाडी फाट्यानजीक असलेल्या एका कंपनीच्या आरएमसी प्लांटच्या क्रशरमधून बाहेर पडणाऱ्या धुळीपासून परिसरातील १०० एकर क्षेत्राच्या पिकावर धुळीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तरी याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशा मागणीची निवेदन निवासी तहसीलदार धनश्री यादव यांना देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या भागात केळी, झुकिनी, काकडी, कोबी, फ्लॉवर व पालेभाज्यांसह वेगवेगळ्या प्रकारची पिके घेतली जातात. मात्र प्लांटची धूळ नियमित पिकावर पडल्यामुळे भाजीपाला पिकांचा दर्जा खालावला आहे.

व्यापारी असा माल परत पाठवत आहेत. ऊसपिकावरही त्याचा थर बसून त्याची वाढ खुंटली आहे. आसपास परिसरात लोकवस्ती असल्याने ग्रामस्थांना श्वसनाचे विकार होत आहेत.

आजाराचे प्रमाण वाढले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयाचे शेतीचे नुकसान होत आहे. तरी संबंधित कंपनीच्या आरएमसी प्लांटवर चालकावर योग्य ती कारवाई करावी; अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसह शेतकरी एकत्र येऊन हा कंपनीचा प्लांट बंद पाडण्यात येईल.

Farmers of Valwa
Sangli Kolhapur Farmers : : सांगली -कोल्हापूर रस्ता भूसंपादनावरून शेतकरी आक्रमक, खासदार मानेंवर प्रश्नांची सरबत्ती

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भागवत जाधव, इंद्रजित मोहिते, तानाजी साठे, प्रभाकर पाटील, प्रताप पाटील, प्रकाश माळी, संतोष परीट, बाळासाहेब सावंत, मोहन सावंत, दिनकर मोहिते, तुकाराम माने, रमेश माने, रवींद्र माने, वसंत परीट, मारुती शेटे, ज्ञानदेव माने आदी शेतकरी उपस्थित होते.

व्यापाऱ्यांना परत पाठवला भाजीपाला

मुंबई येथील कृषी उत्पन्न बाजार समिती वाशी येथील फ्लावर ही भाजी मार्केटसाठी पाठवली असता व्यापाऱ्यांनी धुळीकणामुळे भाजीपाला परत पाठवला. शेकडो किलो माल मुंबईसारख्या बाजारपेठेत जाऊन परत आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com