Maharashtra Rains
Maharashtra RainsAgrowon

Vidarbha Flood Situation: विदर्भात सर्वदूर संततधारेमुळे पूरस्थिती

Maharashtra Rains: विदर्भात गेल्या २४ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब झाले असून, ३८ पेक्षा अधिक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.
Published on

Nagpur News: पूर्व विदर्भात गेल्या २४ तासांपासून पावसाची रिपरिप सुरू असल्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, भंडारा जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या जिल्ह्यांत नदी-नाले तुडुंब झाले असून, ३८ पेक्षा अधिक मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात पावसामुळे शाळांना दोन दिवस सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्‍यात गेल्या २४ तासांत सर्वाधिक १०३.७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. जिल्ह्याची सरासरी ५७.७ मिमी असल्याचे सांगण्यात आले. पावसाची तीव्रता अधिक असल्याने कुरखेडा-मालेवाडा, कोरची-बोटेकसा-भीमपूर, कोरची-भीमपूर नाला, मांगदा-कलकुली, कढोली-उराडी, चातगाव- पिसेवाडा, गोठनगडी-सोनसरी, कुरखेडा-तळेगाव,

Maharashtra Rains
Flood Situation : पूर्व विदर्भात पूरस्थितीमुळे हाहाकार

शंकरपूर-जोगीसाखरा, आष्टी-उसेगाव, वैरागड-देलनवाडी, चौडमपल्ली-चपराळा, सावरगाव-गारपट्टी, अरसोडा-कोंढाळा, मालेवाडा-खोब्रामेंढा यांसह सुमारे वीस मार्गांवरील वाहतूक पुरामुळे बंद करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक प्रकल्पाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत असल्याचे सांगण्यात आले.

Maharashtra Rains
Marathwada Flood Situation : 'मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घ्या', काँग्रेस नेते आक्रमक

जिल्ह्यातील महत्त्वाचा प्रकल्प असलेल्या गोसेखुर्दचे ३३ गेट उघडण्यात आले असून, यातून ११०४.०९ क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग केला जात आहे. धापेवाडा प्रकल्पाचे देखील गेट उघडण्यात येत त्यातून मुक्‍त प्रवाह सुरू आहे. चिंचगाव (ता. लाखांदूर) येथे घरात पाणी शिरल्याने एका कुटुंबाला सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. नागपूर जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सुमारे ७७.९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

त्यामध्ये सर्वाधिक ११८.६ मिमी पावसाची नोंद भिवापूर तालुक्‍यात घेण्यात आली आहे. त्यानंतर ६७.८ मिमी नागपूर शहर, ६४.७ मिमी नागपूर ग्रामीण, कामठी ८८.८, रामटेक १०७, मौदा १००.३, उमरेड ८०.८, काटोल ४३.८, नरखेड ५३.६, पारशिवणी ९९.९ मिमी याप्रमाणे पाऊस बरसला. मौदा तालुक्‍यातील धामणगाव-सुंदरगाव मार्गावरील वाहतूक पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बंद करण्यात आली. अमरावती, यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात देखील पावसाची संततधार सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. 

Chart
ChartAgrowon

भंडारा जिल्ह्यातील ४० पैकी ३८ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. याचा मोठा फटका रस्ते वाहतुकीला बसला असून सुमारे १८ मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात पूरस्थिती बिकट होण्याची शक्‍यता पाहता जिल्हाधिकारी डॉ. संजय कोलते यांनी मंगळवारी (ता.८) आणि बुधवारी (ता.९) असे दोन दिवस शाळा, महाविद्यालयांना सुटी जाहीर केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com