Heavy Rain : अहिल्यानगर जिल्ह्यातील वीस मंडलांत अतिवृष्टीची नोंद
Ahilyanagar News : अहिल्यानगर जिल्ह्यात रविवारी (ता. २५) मुसळधार पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भागाला झोडपले. सोमवारी (ता. २६) सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल वीस मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
त्यात सलग दुसऱ्या दिवशी चार मंडलांत अतिवृष्टी झाली. रविवारी कर्जत तालुक्यातील खेड मंडलात सर्वाधिक १३६ मिलिमीटरची नोंद झाली असून शेतपिकांचे नुकसान सुरूच आहे. शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभर अधून-मधून पाऊस सुरू होता.
जिल्ह्याच्या दक्षिण भागातील कर्जत, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी, नेवासा, पारनेर, राहुरी, राहाता, शेवगाव, अहिल्यानगर तालुक्यांतील बहुतांश गावाला मुसळधारेने झोडपले आहे. सोमवारी (ता. २६) सकाळी उघडीप होती.
रविवारी रात्री पाऊस सुरू होता. सोमवारी सकाळी झालेल्या नोंदीनुसार राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी, कर्जतमधील खेड, वालवड, माही, कोंभळी, भांबोरा, कर्जत, श्रीगोंद्यातील आढळगाव, भानगाव, देवदैठण, पेंडगाव, पारनेरमधील पळवे, सुपा, भाळवणी, पारनेर, अहिल्यानगर तालुक्यातील नेप्ती, चास, चिचोंडी, नागापूर, भिंगार अशा वीस महसूल मंडलांत अतिवृष्टी झाली.
याशिवाय बारागाव नांदूर, वांबोरी, टाकळीमिया, राहुरी, सोनई, तिसगाव, मिरी, करंजी, कान्हूरपठार, निघोज, वाडेगव्हाण या मंडलांत ६० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला.
मंडलनिहाय झालेला पाऊस
संगमनेर ः ३५, धांदरफळ ः ३७, सिबलापूर ः ३२, तळेगाव ः ३४, समनापूर ः ४३, पिंपरणे ः ३७, अकोले ः ३७, वीरगाव ः ३१, समशेरपूर ः ४१, कोतुळ ः ४५, ब्राह्मणवाडा ः ४५, बारागाव नांदूर ः ६३, वांबोरी ः ६३, ब्राह्मणी ः ६५, टाकळीमिया ः ६४, राहुरी ः ६४, देडगाव ः ४४, वडाळा ः ३७, प्रवरासंगम ः ३७, सोनई ः ६२,, घोडेगाव ः ४९, चांदा ः ३८ कुकाणणा ः ४४, सलाबतपूर ः३७, नेवासा ः ३७, खरवंडी ः २८, तीसगाव ः ६०, मिरी ः ६२, करंजी ः ६०, कोरडगाव ः २०, टाकळी ः २८, माणिकदौंडी ः ४८, पाथर्डी ः ४८, एरंडगाव ः४३, दहिगावने ः ४३, मुंगी ः ४३, ढोरजळगाव ः ५६, बोधेगाव ः ४४, चापडगाव ः ४४ भातकुडगाव ः ५४,
शेवगाव ः ५४ , साकत ः २८, पाटोदा ः ३७, नायगाव ः ३२, नान्नज ः ४२ खर्डा ः १७, अरणगाव ः ४१, जामखेडः २३, कोरेगाव ः ३८, खेडः १३६, वालवड ः १०३, कुळधरण ः ४८, माही ः ७२, मिरजगाव ः २९, कोंभळी ः ७४, भांबोरा ः ८४, राशीन ः ३०, कर्जत ः १०३, आढळगाव ः ८२, भानगाव ः ८२, लोणी व्यंकनाथ ः ३५, कोळगाव ः३५, देवदैठण ः ७६, चिंभळा ः ३६, पेंडगाव ः ९४, बेलवंडी ः ४१, मांडवगण ः ३३, काष्टी ः ५४, श्रीगोंदा ः ५८, पळवे ः ६६, टाकळी ः ५६, पळसी ः ३५, कान्हूरपठार ः ६०, निघोजः ५९, वडझिरे ः ५०, वाडेगव्हाण ः६२, सुपा ः ७७, भाळवणी ः ९०, पारनेर ः ६८, नेप्ती ः ७२, रुईछत्तिशी ः ३९, चास ः ९३, वाळकी ः ३७, चिचोंडी ः ६६, जेऊर ः ५३, नागापूर ः ७५, भिंगार ः ७३, केडगाव ः ४०, सावेडी ः २०, कापूरवाडी ः ३८
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.