Marathwada Flood Situation : 'मराठवाड्यातील पूरस्थितीची गांभिर्याने दखल घ्या', काँग्रेस नेते आक्रमक

Marathwada Rain : मराठवाड्यातील जिल्ह्यांचे पालकमंत्री कुठे आहेत ? नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करा पण आधी शेतकऱ्यांना मदत द्या अशी मागणी काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली.
Marathwada Flood Situation
Marathwada Flood Situationagrowon
Published on
Updated on

Congress Leaders Criticize State Govrnment : मराठवाड्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा बसला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. रस्ते व पुल वाहून गेल्याने मराठवाड्यातील अनेक गावांचा इतर भागाशी संपर्क तुटला आहे. पुराच्या पाण्याने शेतातील उभे पिक वाहून गेल्याने खरीप हंगामही वाया गेला. शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. नद्या, नाल्यांना पूर आला आहे. सरकारने इव्हेंटबाजी व जाहिरातबाजी बाजूला ठेवून मराठवाड्यातील पूरग्रस्त लोकांना तातडीने मदत पोहचवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्याचे विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, मागील दोन दिवसापासून मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली, बीड,धाराशिव, लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. हजारो घरांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने लोकांची तारांबळ उडाली, घरांची पडझडही झाली आहे. मराठवाड्याला पुराने वेढले आहे.

पूरग्रस्त लोकांना मदतीची नितांत गरज असून राज्य सरकारने याकडे गांभिर्याने लक्ष दिले पाहिजे. पूरग्रस्तांना सरकारी मदत तातडीने पोहचेल याची व्यवस्था करावी. जेथे गरज असेल तेथे SDRF/ NDRF च्या तुकड्या पाठवा. नुकसानीच्या पंचनाम्याचे निर्देश द्यावेत पण त्याआधी तातडीची मदत जाहीर करून ती पूरग्रस्त व नुकसान झालेल्या लोकांपर्यंत पोहचण्याची व्यवस्था करावी.

Marathwada Flood Situation
Hingoli Heavy Rain : हिंगोलीत मुसळधार पावसाने हाहाकार; ७१ गावांना सतर्क राहण्याचे प्रशासनाचे आदेश

पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांची सर्व व्यवस्था करावी. सर्व सरकारी यंत्रणा तातडीने कामाला लावून जनतेला आधार देण्यास व सर्व प्रकारची मदत पोहोचेल याकडे लक्ष देण्याची गरज आहे. हिंगोली शहरासह अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने परिस्थीती गंभीर बनली आहे.

पूरग्रस्त भागातील लोकांना जास्तीत जास्त मदत पोहचवण्यासाठी सरकारने तातडीने आदेश द्यावेत. अद्यापही पालकमंत्री जिल्ह्यांमध्ये पोहोचले नाहीत. लाडका उद्योगपती व लाडक्या कंत्राटदारासाठी जसे सरकार जलतगतीने काम करते त्यापेक्षा जास्त गतीने पूरग्रस्त व शेतकऱ्यांना मदत द्या, असेही नाना पटोले म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com