
Akola News : पश्चिम विदर्भात पावसाने जोरदार हजेरी लावत वाशीम आणि बुलडाणा जिल्ह्यांतील काही भागांत सलग दुसऱ्या दिवशी दमदार पावसाची नोंद झाली आहे. विशेषतः बुलडाणा जिल्ह्यातील सुलतानपूर व अंजनी बुद्रुक या मंडलांमध्ये तब्बल १८० मिमीपेक्षा अधिक पाऊस झाला. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यातील अनेक भागात पावसाचा तडाखा बसला असून काही ठिकाणी १०० मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे
गेल्या दोन दिवसांतील या मुसळधार पावसामुळे नदी-नाले वाहू लागले आहेत. वाशीम जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात ४८ तासांतील जोरदार पावसामुळे नद्यांना पूर वाहले. काटेपूर्णा प्रकल्पात २४ तासांत तब्बल ६ दलघमी पाणीसाठा तयार झाला आहे. १२ दलघमी साठा आता १८ दलघमीपर्यंत पोचला आहे. प्रकल्पात पाण्याची आवक अद्याप कायम आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत जूनमध्ये या काळात अधिक साठा तयार झाला आहे.
या पावसाने मेहकर तालुक्यात बऱ्याच ठिकाणी प्रचंड नुकसान केले. भोसा परिसरात जमीन खरडून गेली. खुदलापूर परिसरात जमीन खरडल्याचे प्रकार झालेले आहेत. नाल्याचे पाणी शेतांमधून वाहले. डोणगाव परिसरात नदीला पूर आल्याने नागपूर-औरंगाबाद महामार्ग काही काळ बंद होता.
मेहकर तालुक्यातील देऊळगाव साकरशा येथील उतावळी प्रकल्प अवघ्या ४ तासात भरला. मोठ्या प्रमाणात प्रकल्पातून पाणी वाहल्याने प्रकल्पाखालील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत. वाशीम जिल्ह्यात मालेगाव, रिसोड तालुक्यातही शेतकऱ्यांचे अतिवृष्टीने मोठे नुकसान केले आहे.
जोरदार पाऊस झालेली प्रमुख मंडळे
वाशीम जिल्हा ः केनवड १२९ मिमी, शिरपूर १२५.२ , करंजी १०५ , नागठाणा १०५ ,चांडस १०३.८
बुलडाणा जिल्हा ः अंजनी बुद्रुक १८३.८, सुलतानपूर १८३.५, नायगाव दत्तापूर १३४.३, जानेफळ १२९ ,मलकापूर पांग्रा १०७
जिल्हानिहाय सरासरी पाऊस
अकोला ११.९ मिमी
बुलडाणा ४४.८ मिमी
वाशीम ५२.८ मिमी
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.