Women Empowerment : फळप्रक्रिया उद्योगातून महिलांना आर्थिक बळ

Chiku Fruit Processing Industry : बोर्डी परिसरातील महिलांनी चिकू फळ प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली आहे. चिकूपासून पावडर, चिप्स, लोणचे, चॉकलेटसह आवळ्यापासूनही अनके पदार्थ तयार करण्यात येत असून येथील महिलांना नियमित रोजगार मिळत आहे.
Fruit Foods
Fruit FoodsAgrowon

Mumbai News : सध्या शेतकऱ्यांच्या फळबागेमध्ये हळूहळू चिकूचा हंगाम सुरू झाला आहे. बाजारपेठेत चिकू फळांची आवकदेखील वाढली आहे. त्याचबरोबर हवामानात गारवादेखील वाढला असून झाडावरून फळे पिकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याने बोर्डी परिसरातील महिलांनी चिकू फळ प्रक्रिया उद्योगाला सुरुवात केली आहे.

चिकूपासून पावडर, चिप्स, लोणचे, चॉकलेटसह आवळ्यापासूनही अनके पदार्थ तयार करण्यात येत असून येथील महिलांना नियमित रोजगार मिळत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक बळकटीकरण होत आहे.

Fruit Foods
Women Empowerment : मिळून साऱ्याजणी, घालू आकाशाला गवसणी

डहाणू तालुक्यात हजारो हेक्टर चिकू बागायती विकसित झाल्या आहेत. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असल्यामुळे तसेच हवेत गारवा आल्यानंतर फळे पिकण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे फळांना किंमत मिळत नाही. बाजारपेठेत भावदेखील कोसळत असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.

यावर उपाय म्हणून या भागातील महिलांनी चिकू फळप्रक्रिया उद्योगावर भर दिला. फळप्रक्रिया उद्योगातील लतिका पाटील यांनी सायन्स फॉर सोसायटीने विकसित केलेल्या सौरशक्तीवर चालणाऱ्या ड्रायरचा वापर करून उत्पादन सुरू केली. त्यामुळे मालाची गुणवत्ता, टिकाऊपणा वाढला.

Fruit Foods
Chiku Cultivation Success Story : सहा एकर चिकू बागेतून भरभरून गोडवा

चिकू, आवळ्यापासून बनतात हे पदार्थ

सोरल ड्रायरमध्ये वाळवलेल्या चिकूपासून तयार केलेल्या चिकू चिप्स, चिकू पावडर, चॉकलेट, चिकू लोणचे अशा विविध प्रकारच्या पदार्थांना आकर्षक पॅकिंगमुळे पर्यटकांनी पसंती दिली असून देशाच्या व परदेशातील विविध भागात या पदार्थांना मागणी वाढली आहे.

सोलर ड्रायरमध्ये आवळा मुखवास, शेवग्याच्या पानाची पावडर, कडीपत्ता पावडर, पुदिना पावडर तसेच आवळा लोणचे, मोरावळा, आवळा चुंदा, आवळा कॅन्डी अशा अनेक पदार्थाची निर्मिती होत असल्यामुळे महिलांचा उत्साहदेखील वाढला आहे.

मागच्या सहा वर्षांपासून मी लतिका पाटील यांच्याकडून सायन्स फॉर सोसायटीने विकसित केलेला सोलर ड्रायरवर चिकू फळप्रक्रिया उद्योग चालवते. या उद्योगामुळे माझ्या बागेतील पिकलेल्या फळांचे विविध पदार्थ तयार करता येत असल्यामुळे यातून मला चांगला रोजगार मिळाला आहे. तसेच यातून मी इतर महिलांनादेखील रोजगार उपलब्ध करून दिला आहे. चिकू फळप्रक्रिया उद्योग वाढीसाठी शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
शिल्पा बारी, महिला उद्योजक

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com