Farmer Issue: नियतीनेच तोडला थुट्टे कुटुंबाचा ‘भरवसा’

Maharashtra Agriculture Crisis: बुलडाणा जिल्ह्यातील गणेश श्रीराम थुट्टे व त्यांची पत्नी रंजना थुट्टे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे.
Maharashtra Farmer Issue
Maharashtra Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Buldana News: बुलडाणा जिल्ह्यातील गणेश श्रीराम थुट्टे व त्यांची पत्नी रंजना थुट्टे यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या आत्महत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त होत आहे. या शेतकरी कुटुंबाच्या डोक्यावर बँकेचे दोन लाखांवर कर्ज होते. त्यातच यंदा हुमणी अळीच्या उच्छादामुळे दुबार पेरणीची स्थिती निर्माण झाली होती.

या आर्थिक विवंचनेतच चिखली तालुक्यातील भरोसा गावच्या या दांपत्याने गुरुवारी (ता.२४) सायंकाळी सामूहिक आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्यामागे विवाहित दोन मुली, मुलगा, सून, नात असा परिवार आहे.

Maharashtra Farmer Issue
Marathwada Farmer Issue: मराठवाड्यात ५४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

बुलडाणा जिल्ह्यातील भरोसा गावातील थुट्टे परिवाराकडे पाच एकर कोरडवाहू शेती आहे. यावरच कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवला जातो. यंदा त्यांनी सोयाबीनची पेरणी केली. पीकही चांगले उगवलेही. मात्र हुमणी अळीच्या उच्छादामुळे हे पीक हातातून गेले. दुबार पेरणीचे संकट ओढवले होते.

या शेतकऱ्यावर आधीच सेंट्रल बँक व बँक ऑफ महाराष्ट्र अशा दोन बँकांचे सुमारे दोन लाखांवर कर्ज थकलेले आहे. अशा अवस्थेत दुबार पेरणीसाठी पैसा कसा व कोठून उभा करावा, याची चिंता त्यांना भेडसावत होती. त्यातूनच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे गावकरी सांगत आहेत. या घटनेने केवळ त्यांच्या कुटुंबाला नव्हे, तर अख्ख्या जिल्ह्याला हादरून टाकले आहे.

Maharashtra Farmer Issue
Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

या दांपत्याला दोन मुली आशा आणि नीता, तर मुलगा गणेश अशी अपत्ये आहेत. तिघांचीही लग्न झालेली आहेत. नागेश व पत्नी शीतल यांना तीन वर्षांची मुलगी ज्ञानेश्‍वरी आहे.

शरद जोशींच्या विचारांचे गाव

चिखली तालुक्यातील भरोसा हे गाव शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांचे पाईक गाव मानले जाते. शेतकरी आंदोलनांना या गावातून पाठिंबा मिळत आलेला आहे. त्याच गावात हे घडणे दुर्दैवी मानले जात आहे.

आमदारांकडून सांत्वन

घटनेनंतर सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार मनोज कायंदे यांनी थुट्टे कुटुंबाची भेट घेत सदस्यांचे सांत्वन केले. सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासनही त्यांनी या वेळी दिले. याप्रसंगी चिखलीचे तहसीलदार संतोष काकडे, सहायक गटविकास अधिकारी गजानन पोफळे, अंढेरा ठाणेदार रूपेश शक्करगे, नितीन कायंदे, सरपंच गजानन थुट्टे, विनोद थुट्टे, तलाठी वैशाली मगर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com