Marathwada Farmer Issue: मराठवाड्यात ५४३ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Agriculture Crisis: यंदा जानेवारी ते ११ जुलै २०२५ या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे.
Farmer Issue
Farmer IssueAgrowon
Published on
Updated on

Chhatrapati Sambhajinagar News: यंदा जानेवारी ते ११ जुलै २०२५ या कालावधीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत सुमारे ५४३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. या आत्महत्यांपैकी ३३९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या शासनाच्या मदतीसाठी पात्र ठरल्या ३१७ प्रकरणात प्रत्यक्ष मदत देण्यात आली तर सुमारे ६६ प्रकरणे अपात्र ठरली. याशिवाय १३८ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित असल्याची माहिती आहे.

नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीवरील संकट कमी होण्याची नाव घेत नाहीत. त्यामुळे शेतीवरील संकटामुळे येणारी आर्थिक विवंचना व त्यातून निर्माण होणारे प्रश्‍न यामुळे अनेक शेतकरी टोकाचा निर्णय घेत मृत्यूला जवळ करतात. यंदा आजवरच्या शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात बीड जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्याचे पुढे आले आहे. प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जानेवारी ते ११ जुलै २०२५ या कालावधीत सुमारे ९६ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे समोर आली.

Farmer Issue
Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

त्यापैकी ६० प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली तर ११ अपात्र ठरली आहेत. सुमारे २५ प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. जालना जिल्ह्यात ३४ शेतकऱ्यांनी मृत्यूला जवळ केले. त्यापैकी १८ शेतकरी आत्महत्यांची प्रकरणे मदतीसाठी पात्र तर १६ प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. परभणी जिल्ह्यात ६५ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. त्यापैकी २९ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर १८ अपात्र ठरली.

शिवाय १८ प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. नांदेड जिल्ह्यात ७६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. त्यापैकी ५३ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर तीन अपात्र ठरली. २० प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. बीड जिल्ह्यात सर्वाधिक १३६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी ९३ प्रकरणे शासनाच्या मदतीसाठी पात्र तर १९ अपात्र ठरली. २४ आत्महत्यांची प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत.

लातूर जिल्ह्यात ३९ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यापैकी २६ प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर १३ प्रकरणे चौकशी व निर्णयाकरिता प्रलंबित आहेत. धाराशिव जिल्ह्यात सुमारे ६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यापैकी ४४ प्रकरणे मदतीसाठी पात्र तर ९ प्रकरणे अपात्र ठरली. १३ प्रकरणांत चौकशी व निर्णय प्रलंबित आहे. वाढत्या शेतकरी आत्महत्या लक्षात घेता शेतीचे, शेतकऱ्यांचे प्रश्‍न निकाली काढण्यासाठी शासन स्तरावरील उपाय योजना आता तरी गतिमानतेने राबविल्या जातील का, असा प्रश्‍न उपस्थित होतो आहे.

Farmer Issue
Farmer Issues: सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या अडीचशे तक्रारी

३१७ प्रकरणात मदत

प्रशासकीय सूत्रांच्या माहितीनुसार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत आतापर्यंत मदतीसाठी पात्र ठरलेल्या ३३९ पेकी ३१७ शेतकरी आत्महत्यांच्या प्रकरणात प्रत्येकी एक लाख रुपयांप्रमाणे शासनाने मदत दिली आहे. त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ६०, जालन्यातील १२, परभणीतील २९, हिंगोलीतील १६, नांदेडमधील ४०, बीडमधील ९३, लातूरमधील २३, धाराशिवमधील ४४ प्रकरणांचा समावेश आहे. सुमारे ३ कोटी १७ लाख रुपयांची मदत आतापर्यंत देण्यात आल्याची माहिती प्रशासनाच्या सूत्रांनी दिली.

महिनानिहाय शेतकरी आत्महत्या प्रकरणे

(पात्र-अपात्र)

महिना पात्र अपात्र

जानेवारी ८८ ६८

फेब्रुवारी ७५ ६१

मार्च ११० ८८

एप्रिल ८९ ६६

मे ७८ ४२

जून ८० १४

११ जुलै २३ ०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com