Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Farmers In Distress: मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि सरकारच्या न दिलेल्या आश्वासनांवर उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज (ता.३) सरकारला धारेवर धरलं.
Bhaskar Jadhav In Assembly
Bhaskar Jadhav In AssemblyAgrowon
Published on
Updated on

Mumbai News: मे महिन्यातील अवकाळी पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान, विदर्भ-मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण आणि सरकारच्या न दिलेल्या आश्वासनांवर उबाठा गटाचे नेते भास्कर जाधव यांनी आज (ता.३) सरकारला धारेवर धरलं. शेतकऱ्यांना हेक्टरी किमान ५० हजार रुपये नुकसान मदतीची मागणी जाधव यांनी केली.

यावेळी नुकसानीचे पंचनामे आणि ‘मागेल त्याला सौरपंप’ पिक विमा योजनेच्या अपयशावर सडकून टीका करत सरकारवर निशाणा साधला. तर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पावले उचलण्याची मागणीही केली. विधानसभा अधिनियम २९३ अंतर्गत शिवसेना (उ.बा.ठा.) गटाचे नेते भास्कर जाधव यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर सभागृहातील चर्चे सहभाग घेतला.

Bhaskar Jadhav In Assembly
Marathwada Farmers Death : मराठवाड्यातील ५०१ पैकी २९७ शेतकरी आत्महत्यांची प्रकरण मदतीसाठी पात्र

जाधव म्हणाले, "मे महिन्यात अवेळी पडलेल्या पावसाने केळी, पेरू, द्राक्ष, भात या प्रकारच्या पिकांच पावसाने मोठं नुकसान केलं. नदी, नाल्यांनी त्यांची हद्द सोडल्याने जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं. शेतकरी आणि सामान्य नागरिक यामुळे हवालदिल झाले. १ जानेवारी ते ३१ मार्च २०२५ पर्यंत विदर्भ आणि मराठवाड्यातील २६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.

वर्षभराच्या हिशेबाने पाहायचे झाल्यास ही संख्या हजाराच्या वर जाते." असंही जाधव म्हणाले. सरकारच्या आश्वासनाचा समाचारही जाधवांनी घेतला. "सरकारने निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना खूप आश्वासने दिली होती. जसे सातबारा कोरा करू वगैरे-वगैरे अशी आश्वासने देऊन सत्ता मिळवली आणि आता योग्य वेळेला कर्जमाफी देऊ असं बोलून शेतकऱ्यांच्या तोंडाला पान पुसण्याच काम सरकार करत आहे.

Bhaskar Jadhav In Assembly
Maharashtra Farmer Crisis: पोशिंदा जगायला हवा

लोकांच्या भावनेशी खेळणे हीच योग्य वेळ आहे का? निवडणुकीच्या आधी आश्वासन दिल होत आता ते काय पुढील निवडणुकीला पूर्ण करणार काय?" असा सवालही उपस्थित केला. हेक्टरी शेतकऱ्यांना किमान ५० हजार रुपये मिळण्याची नुकसान भरपाई तत्काळ मिळण्याची गरज आहे. शेतकऱ्यांचे पंचनामे अजून झालेले नाहीत.

जिओ टॅगिंग प्रक्रियेत दोष आहेत.त्यामुळे पंचनामे ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन्ही प्रकारे केले पाहिजेत. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका समोर ठेऊन सरकार शेतकऱ्यांच्या आणि सामान्य नागरिकांच्या कोपराला गुळ लावण्याचा प्रकार करत असल्याची टिकाही जाधव यांनी केली.

सरकारने आणलेल्या ‘मागेल त्याला सौरपंप’ या योजनेचा बोजवारा उडाल्याचंही जाधव म्हणाले. तसेच १ रुपयात पिक विमा योजनेत विमा कंपन्यांचं उखळ पांढर झालं. सरकारने या योजनेसाठी स्वतःची भलामण केली आणि नंतर याच कंपन्यांनी फसवल असं कबूलही केलं. त्यामुळे या योजनेन काहीच साध्य झालं नाही हे सिद्ध होत, असा टोला जाधवांनी लगावला.

दरम्यान, शेतकऱ्याला कुठलही पिक पिकवण्यासाठी प्रती हेक्टरी किमान ६० हजार रुपये खर्च येतो. जर नैसर्गिक संकटांनी शेतकऱ्यांना तडाखा दिला तर हा सगळा खर्च केलेला पैसाही जातो आणि पीकही वाया जात. त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांची मदत करावी आणि त्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी विनंती भास्कर जाधव यांनी सरकारला केली. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com