Cotton Sowing : कोरडवाहू क्षेत्रातील कापूस पिकाला पावसाची गरज

Kharif Season : खानदेशात यंदा पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बरी आहे. रोजच्या हलक्या, मध्यम पावसाने तण वाढले. तणनियंत्रणाचे कामही अनेक भागांत सुरू आहे.
Cotton Sowing
Cotton SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा पूर्वहंगामी कापूस पिकाची स्थिती बरी आहे. रोजच्या हलक्या, मध्यम पावसाने तण वाढले. तणनियंत्रणाचे कामही अनेक भागांत सुरू आहे. पूर्वहंगामी कापसाची वाढ होत असून, कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला मात्र चांगल्या पावसाची गरज आहे.

कोरडवाहू क्षेत्रातील कापसाची स्थिती फारशी चांगली नाही. पूर्वहंगामी कापूस पिकात आंतरमशागत सुरू आहे. अनेक भागात मजूर उपलब्ध होत नसल्याने शेतकरी तणनाशकांचा उपयोग करून त्यातील तण नष्ट करीत आहेत.

खानदेशात मागील पाच ते सात दिवसांत अपवाद वगळता चांगला पाऊस झालेला नाही. काळ्या कसदार जमिनीत वाफसा असल्याने आंतरमशागतीला वेग आला आहे. अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी नसल्याने त्यांना भाडेतत्त्वावर बैलजोडी घेऊन आंतरमशागत करून घ्यावी लागत आहे.

Cotton Sowing
Cotton Sowing: कापूस लागवडीत २० टक्क्यांची पंजाबमध्ये वाढ; सरकारकडून बियाण्यासाठी अनुदान

१३०० ते १५०० रुपये रोज असा दर बैलजोडीकरवी आंतरमशागतीसाठी बैलजोडीमालक घेत आहेत. दिवसभरात पावणेदोन एकर क्षेत्रात आंतरमशागत बैलजोडीकरवी होऊ शकते. पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड खानदेशात २० मे पासून झाली आहे. अनेकांचे पीक ५० दिवसांचे झाले आहे. तर काहींचे पीक ४० दिवसांचे आहे.

५ जूनपर्यंत पूर्वहंगामी कापूस पिकाची लागवड खानदेशात कृत्रिम जलसाठाधारक शेतकऱ्यांनी केली आहे. पिकाची स्थिती चांगली आहे. त्यावर किडींची समस्याही असून, शेतकरी फवारण्या घेत आहेत. किडनाशके, संप्रेरकांचा उपयोग शेतकरी किडी थोपविण्यासाठी करीत आहेत.

Cotton Sowing
Cotton Sowing Decline : मोताळ्यात शेतकऱ्यांचा कल मका, तूर, सोयाबीनकडे

पिकाची उंची एक ते दीड फूट एवढी आहे. अनेकांनी सघन पद्धतीने लागवड केली होती. या क्षेत्रातील पीकही बऱ्यापैकी आहे. तर काहींनी तीन बाय साडेतीन फूट, देन बाय चार फूट या अंतरात कापूस लागवड केली होती.

तणनाशकांचा उपयोग

एकाच वेळी सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात तणनियंत्रणाचे काम सुरू झाले आहे. यामुळे अनेक शेतकरी तणनाशकांचा उपयोग करून तण नष्ट करीत आहेत. तणांची वाढही पावसाने झाली आहे. बाजारात विविध प्रकारची तणनाशके असून, त्यांचा उपयोग तण नष्ट करण्यासाठी केला जात आहे. एकरी १२०० ते १६०० रुपये खर्च यासाठी येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com